कराड : मराठा आरक्षणप्रश्नी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवण्यात काही तथ्य नसल्याचा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. छगन भुजबळ यांनी राईचा पर्वत करत मुक्ताफळे उधळू नयेत असा सल्ला त्यांनी मंत्री भुजबळांना दिला. कराडमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात आमचे सरकार असते, तर मराठा समाजाला दिलेले आरक्षण पुढे कायम राहिले असते, या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वक्तव्यावर बोलताना मंत्री विखे-पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दुर्दैवी वाताहतीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेतून गेले. पृथ्वीराज चव्हाण यांनीच त्यावेळी आघाडीचे सरकार घालवण्याचे काम केले. आता त्यांनी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवणे, यात काही तथ्य नाही अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.
“मराठा आरक्षणप्रश्नी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवण्यात काही तथ्य नाही”, विखे-पाटील यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला
छगन भुजबळ यांनी राईचा पर्वत करत मुक्ताफळे उधळू नयेत असा सल्ला त्यांनी मंत्री भुजबळांना दिला.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-11-2023 at 13:33 IST
TOPICSछगन भुजबळChhagan Bhujbalपृथ्वीराज चव्हाणPrithviraj Chavanमराठा आरक्षणMaratha Reservationमराठी बातम्याMarathi Newsराधाकृष्ण विखे पाटीलRadhakrishna Vikhe PatilसरकारGovernment
+ 2 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad bjp radhakrishna vikhe patil criticises prithviraj chavan on maratha reservation issue css