कराड : कराड शहराच्या वाढीव भागातील मुजावर कॉलनीत दहा दिवसांपूर्वी (दि. २५ ऑक्टोंबर) सामाजिक कार्यकर्ते शरीफ मुबारक मुल्ला (३५) यांच्या घरात सकाळच्यावेळी झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी असलेल्या सुलताना मुल्ला यांच्या मृत्यूच्या पाठोपाठ शरीफ मुल्ला यांचाही आज शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शरीफ मुल्ला यांच्या घरात झालेल्या स्फोटात लगतच्या पाच घरांचे व घटनास्थळावरील सहा दुचाकींचे नुकसान झाले होते. तर, शरीफ मुल्ला यांच्यासह त्यांची पत्नी सुलताना (३३), घरातील दोन लहान मुले व नजीकच्या घरातील अन्य तीन ते चार जण जखमी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक संपली, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचं पुढचं पाऊल काय? माहिती देत म्हणाले…

हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी बसेसची तोडफोड, घरे अन् शासकीय कार्यालयांची जाळपोळ; सदावर्तेंची उच्च न्यायालयात धाव, याचिकेत काय?

सातारा, पुण्याच्या फॉरेन्सिक चाचणी पथकाने घटनास्थळी पाहणी करून त्याचे नेमकेपणाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीमुळेच हा स्फोट झाल्याचे आत्तापर्यंत गृहीत धरले गेले. परंतु, फॉरेन्सिक चाचणी पथकाचा अहवाल आणि पोलिसांचा नेमका निष्कर्ष अधिकृतपणे समोर आलेला नाही. त्यामुळे ही स्फोटाची दुर्घटना संशयाच्या भोवऱ्यातच असताना, घटनेच्या आठव्या दिवशी सुलताना मुल्ला तर, दहाव्या दिवशी शरीफ मुल्ला यांचे उपचार घेत असताना निधन झाले. त्यामुळे त्यांची दोन लहान मुले आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत. जोराचा स्फोट आणि त्यातून घडलेल्या भीषण दुर्घटनेचे मुल्ला दाम्पत्याच्या मृत्यूमुळे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या दुर्घटनेच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीचा उलगडा करणे, हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad couple died in hospital after the blast at their home in mujawar colony css