कराड : अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे सांगतानाच मराठा आरक्षणाप्रश्नी वाचाळवीरांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील कोणत्या शहरात सर्वात महाग पेट्रोल आहे? जाणून घ्या…

जालना जिल्ह्यातील अंतरवाली- सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणादरम्यान, एक सप्टेंबर रोजी झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी प्रमुख संशयित आरोपी म्हणून ऋषिकेश बेदरे या तरुणास पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह ताब्यात घेऊन अटक केल्यासंदर्भात विचारले असता अजित पवार बोलत होते. ही दगडफेक आणि पोलीस लाठीचार या संपूर्ण प्रकाराचा तपास कोणत्याही दबावात न येता केला जाईल असा विश्वास त्यांनी दिला. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्या असल्याचा पुनरुच्चारही अजित पवारांनी यावेळी आवर्जून केला.