कराड : राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात बंदिवासात वाढविलेल्या १० जटायुंना (गिधाडांना) जीपीएस टॅग लावून निसर्गात उंच भरारी घेण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. त्यातून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) शास्त्रज्ञांच्या तीन दशकातील प्रयत्नांना यश आल्याची माहिती निसर्ग संवर्धन, पर्यावरणवादी कार्यकर्ते व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.

रामायणात जटायु पक्षाने सीतामाईला लंकापती रावणापासून वाचविण्यासाठी आपले प्राणपणाला लावल्याचा उल्लेख आहे. पारशी समाजात मृतदेह दफन करण्याऐवजी गिधाडांना खावू देण्याची प्रथा आहे. पण, आज गिधाडेच नामशेष होवू लागली आहेत.

maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

हेही वाचा : सोलापुरात भिशी व फायनान्सच्या माध्यमातून २.६९ कोटींची फसवणूक, १३२ ठेवीदारांना दाम्पत्याने घातला गंडा

दरम्यान, गिधाडांना मुक्त संचार करण्यात यावा म्हणून आखलेल्या योजनेसाठी देशभरातील जंगलांनजीक काही सुरक्षित ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व आसाम राज्यातील काही व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये ३१ तर हरयाणामध्ये ८ गिधाडांना निसर्गात मुक्तपणा देण्यात आला आहे. त्यांच्यावर उपग्रहाच्या माध्यमातून निगरणी सुरु आहे. अवकाशातून फिरत ते शेजारील देशात भुतान, नेपाळ, बंगलादेशमध्ये गेल्यास तेथील पक्षी शास्त्रज्ञांसोबतही समन्वयाने काम सुरू आहे. दरम्यान, चार जटायु नेपाळ व भुतानमध्ये पोहोचले. यातील एका जटायुला विजेचा प्रवाह लागून तो मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. परंतु, अन्य जटायुंपैकी एकालाही विषबाधा (विषयुक्त अन्न सेवनात आले नाही) झाली नसल्याची समाधानाची बाब आहे.

बीएनएचएसने महाराष्ट्र सरकारशी एक करार केला. त्यात पेंच व ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जटायुंना निसर्गात मुक्त करण्यात आले. जानेवारी महिन्यात हरयानातील पिंजोरमधून २० गिधाड आणण्यात आली. त्यांना पेंच व ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भक्ष्य खाण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ‘बीएनएचएस’च्या पुढाकाराने महाराष्ट्र व हरियाणा तसेच भारत सरकारच्या पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय तसेच केंद्रीय प्राधिकरणाच्या संयुक्त प्रयत्नांतून जटायुंना निसर्गात मुक्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा : “काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी…”, अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांचा मोठा दावा

पेंच व्याघ्र प्रकल्पात २ जुलैला १० जटायुंना (गिधाडांना) जीपीएस टॅग लावण्यात आले. बंदिवासात वाढविलेल्या या जटायुंना आता निसर्गात भरारी घेण्यासाठी सज्ज केले जात आहे. टॅगच्या सहाय्याने त्यांच्यावर देखरेख राहणार आहे. या प्रयोगातून महाराष्ट्रात जटायुंची संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : रायगड: डॉ. आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठातील अधिकाऱ्याला अटक

‘बीएनएचएस’चे संचालक किशोर रिठे व क्षेत्र संचालक प्रभूनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. काझवीन उमरीगर, डॉ. कृष्णा, हेमंत बाजपेयी, सचिन रानडे, माननसिंग महादेव, भानूप्रताप सिंह, जेफ फ्रान्सिस, जोनाथन दिकोस्ता, मोहम्मद कासिम, लखन बसुदेव, लोकेश गुर्जर, रवी शर्मा, वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर यांनी ही मोहीम यशस्वी केल्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी म्हटले आहे.