कराड : ‘कराड दक्षिण’चे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे शिलेदार मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव तथा आर आबा यांनी काँग्रेसचा हात सोडून हाती कमळ घेतल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले, तर विधानसभेचे वातावरण तापत असतानाच काँग्रेसच्या बड्यानेत्याला हा धक्का बसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘कराड दक्षिण’वर परिणाम

लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिणेतून महाविकास आघाडीची झालेली पिछेहाट आणि आता राजेंद्र यादव यांनी दाखवलेला हात यामुळे काँग्रेस आणि विशेषतः चव्हाण गटाला बसलेले हे दोन धक्के भाजपचा विश्वास वाढवणारे असून, कराड दक्षिणेच्या राजकारणावर परिणाम करणारे आहेत.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
chandrakant patil replied to rohini khadse
“मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही”, चंद्रकांत पाटील यांचे रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर!
rahul gandhi
राहुल गांधींची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “विरोधी पक्षनेता हे फक्त पद नाही, मी तुमचा…”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा टोला, खोटं बोलून मतं मिळाल्याने आता विरोधकांनी ठरवलंय की..”

भाजपप्रवेश अन् फडणवीस यांच्याशीही चर्चा

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, रवींद्र अनासपुरे, चित्रलेखा माने- कदम आदींच्या उपस्थितीत यादव गटाचा बुधवारी भाजपत प्रवेश झाला. यादव यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अनिता यादव तसेच महिला-बालकल्याण सभापती गीतांजली पाटील, नगरसेविका स्वाती तुपे यांच्यासह असंख्य काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली.

विकसित भारताच्या संकल्पनेला साथ

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी यादव यांचा भाजपत प्रवेश झाला. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी संविधान बदलणार असा खोटारडेपणा करून मतदान मिळवणारी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांना कंटाळून या सर्वांनी भाजपत प्रवेश केला आहे. डॉ. अतुल भोसले यांचा विधानसभेत विजय निश्चित असून, मोदींच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

मलकापुराचा विकास खुंटला

राजेंद्र यादव म्हणाले, मलकापुरच्या विकासासाठी अनेक वर्षे काम करतोय. पण दशकभरात मलकापुराचा विकास खुंटला. त्याला गती देण्यासह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपत प्रवेश केला आहे.

हेही वाचा : “मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही”, चंद्रकांत पाटील यांचे रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर!

कोण आहेत राजेंद्र यादव

मलकापुरात ‘जिकडे आर आबा तिकडे गुलाल’ अशी खासियत असलेल्या राजेंद्र यादवांच्या परिवाराची तीन दशके नगरपालिकेतील विजयाची परंपरा आहे. प्रचंड जनसंपर्क अन् राजकीय पटलावर दबदबा राखत ते स्वतः तीनदा निवडून येताना १० वर्षे बांधकाम सभापती आहेत. त्यांच्या पत्नी, बंधूही नगरसेवक होते. मलकापूरच्या शास्त्रीनगर आणि कराडच्या काझीवाडा- आझाद चौक परिसरात यादव परिवाराचे राजकीय वजन आहे.

हेही वाचा : “निरोप द्यायला सभागृहात तर यायला पाहिजे ना?”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

काँग्रेसला सलग दुसरा धक्का

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मलकापुरातून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना तब्बल तीन हजारांचे मिळालेले मताधिक्य आणि कराड दक्षिणमध्ये महाविकास आघाडीची झालेली पिछेहाट या मुळे पृथ्वीराज चव्हाण समर्थक अस्वस्थ असतानाच राजेंद्र यादवांसह त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला सलग दुसरा जबर धक्का बसला आहे.