कराड : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून फलटण, शिरवळ, लोणंदमधील तब्बल २३ गुन्हे उघड करुन, सोन्याचे ५३ तोळ्यांचे दागिने हस्तगत केले. सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा एकूण २३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यांमधील ५३ तोळे सोन्याचे व सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असा ३२ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरोडा व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलिसांना सक्त सूचना दिल्या आहेत. अनुषंगाने सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी ही मोठी कारवाई यशस्वी केली. त्यांनी सहाय्यक निरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले होते.

हेही वाचा : सिंहस्थ कुंभमेळा नियोजनात भाजपचाच प्रभाव, शिंदे गटाचे पालकमंत्री दुय्यमस्थानी

लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यांमध्ये रोहित उर्फ टक्या चिवळ्या पवार (रा. सुरवडी, ता. फलटण) याचा सहभाग असल्याचे या पथकाच्या तपासात समोर आले. त्यानुसार पोलीस फौजदार अमित पाटील यांनी त्याला ताब्यात घेतले. आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांसोबत खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण व पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. दरोड्याचा एक, जबरी चोरीचे पाच, घरफोडीचे १२ व अन्य चोरींचे पाच असे २३ गुन्हे उघडकीस आले.

हेही वाचा : “…तर महाराष्ट्रात कधीच कायदा-सुव्यवस्था राहणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन; ‘त्या’ प्रकरणावर केलं निवेदन!

वर्षात १३८ गुन्हे

सातारा जिल्हा पोलीस दलाने नोव्हेंबर २०२२ पासून जिल्ह्यातील मालमत्तेसंदर्भातील १३८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांत चोरीला गेलेला २ कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad satara police crime branch arrested a criminal involved in 23 crimes 530 gram gold recovered from him css