कर्जत : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, वादळे,भूकंप व आगीच्या मोठ्या घटना . गोदड महाराज यांच्या संवत्सरी मधील भाकीत यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असे भाकीत संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या हस्तलिखिता मध्ये वर्तविण्यात आले आहे. ज्याला संवत्सरी असे देखील म्हणतात.

अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत येथील संत सद्गुरु गोदड महाराज यांनी येथे संजीवन समाधी घेतली आहे. मात्र तत्पूर्वी त्यांनी अनेक ग्रंथ संहिता यासह विविध प्रकारचे लिखाण केलेले आहे. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी यावर्षीचे भाकीत किंवा भविष्य वाचण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. साठ वर्षांची ही संवत्सरी त्यांनी देश व जागतिक पातळीवरील घटनांबाबत लिहून ठेवली आहे. त्याला श्री सद्गुरु गोदड महाराज फळ.. असे देखील म्हणण्यात शालिवाहन शके १९४७ यावेळी याची लिखाण महाराजानी केले आहे. प्रत्येक वर्षीच भाकीत हे चैत्र पाडव्याच्या दिवशी वाचण्यात येते. यावेळी मोठ्या संख्येने भावी उपस्थित असतात. यावर्षी पाऊस कसा असेल, कोणती पिके चांगली राहती ल, नैसर्गिक संकटे का येतील का, राजकीय घडामोडी काय आहेत या सर्व बाबींचा उल्लेख यामध्ये आढळून येतो.

प्रथे प्रमाणे मानकर यांना वाजत गाजत मंदिरामध्ये आणण्यात येते. त्यानंतर संत गोदड महाराज यांच्या नावाचा गजर करून मंदिराचे पुजारी ह भ प पंढरी महाराज काकडे व ह भ प अनिल महाराज काकडे हे या संवत्सरीचे यावर्षीचे भाकीत काय आहे याचे वाचन करतात. आज या भाकिता मध्ये म्हटले आहे की, यावर्षीच्या संवत्सरीचे नाव विश्वा वसूनाम संवत्सर असे आहे. याचा स्वामी रवी आहे.यावर्षी मोठमोठी वादळे होतील, जोरदार वारा सुटेल,सरासरी पाऊस कमी पडेल, प्रचंड उष्णता यामुळे आगीच्या घटना देखील घडतील, भूकंप होतील, तर देशातील काही भागांमध्ये गारपीट होईल.

पाऊस सर्वत्र सारखा पडणार नसल्यामुळे ज्या भागांमध्ये कमी पाऊस होईल त्या ठिकाणी अन्नधान्याची टचाई यावर्षी निर्माण होईल. यामुळे अन्नधान्याचा संचय करावा असे भाकीत सांगण्यात आले आहे. खरीप पिकानंतर रब्बी पिकाला देखील यावर्षी कमी पावसामुळे अडचण निर्माण होईल. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत आणखी उष्णता वाढेल. या उष्णतेची तीव्रता एवढी असेल की अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतील. चारा जनावरांना कमी होईल. यामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे असताना काही भागांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गारपिटी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडून त्याची देखील संकट निर्माण होईल. आषाढ श्रावण महिन्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे. अश्विन कार्तिक मार्गशीष महिन्यामध्ये वातावरण अनिश्चित असेल. पाऊसही सर्वत्र सारखा न पडता कमी जास्त पाऊस ठीक ठिकाणी होईल. अशा पद्धतीची भाकित यावर्षीच्या गोदड महाराज संवत्सरीमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.