राहाता : कोपरगाव शहरातील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसमोर सोमवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत ३ जण जखमी झाले. घटनेनंतर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दहशत माजविणार्यां कठोर कारवाई करावी व इतर आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज मंगळवारी कोपरगाव शहर व तालुका बंदची हाक सकल मराठा समाज व सर्वपक्षीय संघटनांनी दिली होती. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या रेणुकानगर येथील रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना रस्त्यावर रिक्षा घालण्यास विरोध केल्याच्या रागातून रिक्षाचालक व त्याच्या १०-१२ समर्थकांनी एका माजी नगरसेवक, ठेकेदार व त्याच्या भावांना गंभीर मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री ९ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली.रेणुकानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे समोर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू होते. या रस्त्यावर भंगार भरून निघालेल्या रिक्षाचालकाला ठेकेदार गणेश मोरे, योगेश मोरे, पवन मोरे यांनी विनवणी केली, की रस्त्याचे काम सुरू आहे. त्यावर अंतिम डांबर टाकले असून, आपण या ठिकाणावरून, रिक्षाने म येऊ नये. त्याचा रिक्षाचालकाला राग आल्याने त्याने ठेकेदार गणेश मोरे यांना मारहाण केली. हे भांडण क सोडवण्यासाठी त्यांचे बंधू योगेश व पवन मोरे व माजी नगरसेवक कृष्णा आढाव आले. त्या वेळी रिक्षाचालकाच्या दहा ते बारा समर्थकांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड व दगडाच्या साह्याने वरील चौघांवर हल्ला केला. या चौघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीची बातमी कळताच शहरात तणाव निर्माण झाला.

या घटनेमध्ये गणेश मोरे, योगेश मोरे व पवन मोरे गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ एसजीएस रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले. माजी नगरसेवक कृष्णा आढाव किरकोळ जखमी आहेत. याबाबत योगेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधीनगर येथील अजीम करीम शेख,अमजद जहाबाद पठाण,मजीद रशीद पठाण व अन्य चार ते पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी यातील दोन जणांना अटक केली असून बाकी अद्याप फरार आहेत.

बंदला दुपार पर्यंत प्रतिसाद, आरोपींना कठोर शासन करा, सर्वपक्षीयांची निवेदनाद्वारे मागणी

कोपरगाव शहरात सोमवारी रात्री दोन गटात हाणामारीची घटना घडल्यानंतर एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हल्ला करून दहशत माजवणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, इतर आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज मंगळवारी कोपरगाव शहर व तालुका बंदची हाक मराठा समाज आणि इतर सामाजिक राजकीय संघटनांनी दिली होती मोर्चा होईपर्यंत कोपरगाव शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकल मराठा समाज आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि समाज बांधव यांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर ठिय्या आंदोलन करत घटनेचा निषेध व्यक्त केला त्यानंतर मोर्चा कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोहचला यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.असून या निवेदनात म्हटले आहेत की, शुल्लक कारणावरून भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. या घटनेतील अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. कोपरगाव शहरात वारंवार गोवंश बंदी असताना त्याचे राजरोस उल्लंघन होत आहे.हिंदू संघटनांनी वारंवार इशारे देऊनही त्याकडे विशिष्ठ समाज आणि पोलिस डोळेझाक करत आहे.परिणामी शहरात मोठा संताप व्यक्त होत आहे.वाळूचोरांची शिरजोरी त्यांच्याकडील गावठी कट्टे या बाबी आधीच चिंता निर्माण करणाऱ्या आहे.अशातच गुन्हेगारी वाढत असतानाही पोलिस मात्र वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचे नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.