लातूर : वैशाली चॅरिटेबल ट्रस्ट आणि बुधोडा ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दिनांक १ एप्रिल रोजी बुधोडा येथे बुद्ध मूर्ती स्थापना आणि चौथी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती बालाजी कांबळे यांनी दिली, याप्रसंगी भन्ते उपगुप्त महाथेरो, भंते पयानंद थेरो, भंते बुद्ध शील यांच्यासह भिकू संघाची धम्मदेशना होणार असून बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औशाचे आमदार अभिमन्यू पवार तर उद्घाटक म्हणून एम एस आर डी सी चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड हे राहणार आहेत.

याशिवाय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ,बाबासाहेब पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर आमदार अमित देशमुख ,आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी ,भाजप नेते विश्वजीत गायकवाड ,रिपाई नेते चंद्रकांत चिकटे, कालिदास माने आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहा वाजता नागपूर येथील गायिका अंजली भारती यांचा शाहिरी जलसा होणार आहे .या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी केले आहे.