पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघात नाराज उत्तम जानकर यांनी अखेर मौन सोडले. भाजपाने आमच्या वर अन्याय केला असून आमच्या तालुक्यात आम्ही राजकारणातून बाहेर कसे राहू हेच काम भाजपाने केले. माढा आणि सोलापूर मधील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणून येतील असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला. गेली अनेक वर्षे जानकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष अखेर संपुष्टात आल्याने माढ्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांचे पारडे जड झाल्याचे सध्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा :“माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा…”, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडेंना इशारा

माढा लोकसभा निवडणुकीत नाराजी काढताना नेत्यांची पुरती दमछाक झाली. कधी भाजपा तर कधी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात दिसून आली. या मतदार संघात माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी कधी भाजपा तर कधी तुतारी आशी दोलायमान स्थिती झाली होती. सुरवातीला भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उत्तम जानकर याना खास विमानाने नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली. हि भेट सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया जानकर यांनी दिली. त्याच वेळी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे जाहीर केले. त्यानुसार दि १९ एप्रिल रोजी माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील व जानकर समर्थक उपस्थित होते. यावेळी भाजपाची साथ सोडा आणि तुतारी हाती घ्या असे मत कार्यकर्त्यांनी मांडले. आता मोहिते यांचा प्रचार करू, विधानसभेला मोहिते पाटील तुमचा म्हणजे उत्तम जानकर यांचा प्रचार करतील अशी भूमिकाही कार्यकर्त्यांनी मांडली.

हेही वाचा : “फडणवीस म्हणाले होते, ते आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि स्वत:…”, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा!

त्यानंतर उत्तम जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपावर टीका केली. गेल्या सहा महिन्यांपासून मी व धैर्यशील मोहिते पाटील यांनी नियोजन केल्याचा गौप्यस्फोट केला. आम्हाला कायम डावलण्याची भूमिका घेतली. मला नितीन गडकरी यांनी संपर्क केला होता आणि शब्द खर्ची घालतो असे सांगितले. मात्र आता धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करणार आणि त्यांना विजयी करणार असा निर्धार उत्तम जानकर यांनी व्यक्त केला. एकंदरीत माढ्याची निवडणूकीत मोहिते पाटील यांचे पारडे जड झाले असं म्हंटले तर वावगे ठरणार नाही