रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीत कुठेही मतभेद नसून गुहागर, दापोली आणि रत्नागिरीदेखील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत. दापोली मतदारसंघात वाद नव्हताच, तो एक गैरसमज आहे. मात्र आता हा गैरसमज मिटला आहे. रत्नागिरीत बाळ मानें यांनी भाजपा सोडून विचारांशी गद्दारी केली आहे. तसेच या विधानसभेत राज्यात महायुतीच्या २०० पेक्षा जास्त जागा जिंकून येणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कापसाळ येथील माटे सभागृहात दापोली, गुहागर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली. यावेळी दापोलीतील महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम, गुहागर मधील राजेश बेंडल उपस्थित होते. यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत.

हे ही वाचा… माजी मुख्‍यमंत्र्यांचे चिरंजीव चक्क सामान्‍यांच्‍या खुर्चीत! वलगावातील सभेत…

हे ही वाचा… “राज्‍यात तीन भाऊ, मिळून महाराष्‍ट्र खाऊ…”, उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका

दापोली तसेच गुहागरमध्ये महायुतीत कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी सर्वांचे प्रयत्न असून, कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार डॉ. विनय नातू हे देखील प्रचारात सक्रिय राहिले आहेत. रत्नागिरीत बाळ मानेंनी भाजपाला राम राम केला असला तरी तेथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते महायुती सोबत राहिले आहेत. माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून विचारांशी गद्दारी केलेली आहे. त्यांना भाजपाची कदापी साथ मिळणार नाही. यावेळी उदय सामंत यांनी सांगितले की, बारसू येथील संपादित ५ हजार एकर जागेत रिफायनरी येण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच प्रयत्न केले होते. आता तेच रिफायनरी होऊ नये यासाठी विरोध करीत आहेत. एकीकडे राजापुरातील स्थानिक आमदार रिफायनरीला समर्थन देतात, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत रिफायनरीला विरोध करतात, यात आमची भूमिका स्पष्ट आहे, जनतेचा विरोध स्वीकारून प्रकल्प लादला जाणार नाही. असे ही सामंत यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra assembly election 2024 mahayuti will win more than 200 seats claims by bjp minister asj