सोलापूर : मोठा गाजावाजा करून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा बावटा दाखवून सुरू केलेल्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सार्वत्रिक कौतुक होत असताना याच गाडीत प्रवाशांना चहासोबत दिली जाणारी बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे आॕनलाईन तक्रारही नोंदविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. संपूर्ण वातानुकूलित, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त, आरामदायी आणि मध्यम जलदगती गाडी म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे सर्वत्र उत्सवी थाटात, मोदी-मोदीचा धोशा लावत, वाजत-गाजत स्वागत करण्यात आले होते. प्रवाशांमध्येही याबद्दल समाधानाची भावना व्यक्त होत असताना या वंदे भारतला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : मविआ सरकारमध्ये गृहमंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार नाराज? अधिवेशनात ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण, वाचा प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…

तथापि, सोलापूरहून मुंबईला निघालेल्या याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट खानपान सेवेचा अनुभव प्रवाशांना आला. नागेश पवार हे सोलापूरहून मुंबईला याच गाडीतून प्रवास करीत होते. एकक तर सकाळी १५ मिनिटे उशिरा वंदे भारत एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक सोडले. पुढे काही वेळातच प्रवाशांना खानपान सेवेचा भाग म्हणून चहा-बिस्किटे देण्यात आली. परंतु चहासोबत दिलेली बिस्किटे उत्सुकतेपोटी न्याहाळली असता ही बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची आढळून आल्यामुळे प्रवाशांना धक्का बसला. त्याचा अनुभव नागेश पवार या प्रवाशाला प्रत्ययास आला. तेव्हा त्यांनी तेवढ्याच सजगतेने रेल्वे प्रशासनाकडे आॕनलाईन तक्रार नोंदविली.

हेही वाचा… अलिबाग : बैलगाडी शर्यतीदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू

यासंदर्भात पवार यांनी तक्रारीची चित्रफित तयार करून समाज माध्यमातून प्रसारीत केली. यात चहासोबत त्यांना देण्यात आलेल्या बिस्किटाच्या पाकिटावर बिस्किटाची उत्पादन केल्याची तारीख २६ आॕगस्ट २०२२ आहे. कालबाह्य तारीख २५ फेब्रुवारी २०२३ अशी आहे.

हेही वाचा… ठाकरे गटाचे उरलेले १५ आमदारही शिंदे गटात जाणार?; नारायण राणेंचं सूचक विधान, म्हणाले…

दरम्यान, यासंदर्भात मध्य रेल्वे सोलापूर विभागीय प्रशासनाचे लक्ष वेधले असता वंदे भारत एक्सप्रेसमधील खानपान सेवा आयआरसीटीसीमार्फत केली जाते. याबाबत चौकशी करण्याची माहिती देण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai solapur bound vande bharat express biscuits with expiry date were served to passengers asj
Show comments