पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या चरणी अक्षता कलश ठेवून आयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले. देशभरातील साधू, संतांना आम्ही आमंत्रित करत आहोत. बाकीच्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निमंत्रित करणार असल्याची माहिती अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास उर्फ श्री गोविंदगिरी यांनी दिली. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात दि. २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “तुपकर स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवत असतील तर चांगलंच आहे, पण…”, राजू शेट्टीचं विधान

अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टचे कोशाध्यक्ष किशोर व्यास उर्फ श्री गोविंदगिरी महाराज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आले होते. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट आदी उपस्थित होते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते किशोरजी व्यास यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यास यांनी श्री रामरायाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचे आमंत्रण विविध देवी देवतांना देण्यात येत असल्याचे सांगितले. दरम्यान मंदिर उभारण्याचे जाहीर केल्यापासून देशभरातून ३ हजार ३०० कोटी रूपयांची देणगी गोळा झाली होती. यामधून मंदिर उभारण्यासाठी १ हजार ४०० कोटींचा खर्च होणार आहे. तरीही सतत देणग्यांचा ओघ सुरूच असल्याने आज अखेर २ हजार ९०० कोटी रूपये शिल्लक असल्याचे व्यास यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘सर्वात वाईट अवस्था माझी’, जितेंद्र आव्हाडांची खंत; म्हणाले, “एकिकडे अजितदादा, दुसरीकडे शिंदे…”

परदेशातून देणग्या स्वीकारण्यासाठी एफसीआरएकडे नोंद करण्याचा नियम आहे. यासाठी तीन वर्षांचा वार्षिक अहवाल, ताळेबंद आवश्यक असतो. आम्ही कोणताही नियम न मोडता फेब्रुवारी २०२३ मध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यावरच यासाठी नोंद केली आहे. आता परदेशातून देखील देणग्यांचे ओघ सुरू झाले असल्याची माहिती किशोरजी व्यास यांनी दिली. दरम्यान राज्यात अयोध्येमधील आमंत्रणावरून राजकारण सुरू असून याबाबत व्यास यांना प्रश्न करताच, आम्ही केवळ साधू, संत यांना निमंत्रित केले. उर्वरीत मान्यवरांना निमंत्रण देण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pandharpur vithoba invited for ayodhya ram temple inauguration ceremony css
Show comments