पंढरपूर : पंढरीच्या विठुरायाच्या चरणी दान देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. इथे दर्शनाला येणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या तिजोरीत ४ कोटी ७७ लाख इतके दान विविध माध्यमांतून जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समितीला मिळणाऱ्या दानात १ कोटी ५६ लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

वारकरी संप्रदायात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यासह कर्नाटकातून भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीला येतात. यंदा या यात्रेसाठी जवळपास ४ लाखांहून अधिक भाविक यात्रेला आले होते. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला विविध माध्यमांतून ४ कोटी ७७ लाख रुपये इतकी देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये श्रींच्या चरणावर ४०,१५,६६७ रुपये तर देणगी स्वरूपात १,३०,०५,४८६ रुपये प्राप्त झाले आहेत. मंदिर समितीच्या वतीने देण्यात येत असलेल्या लाडूप्रसादातून ६२,४९,००० रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच ६६,६२,३७७ रुपये भक्तनिवासाच्या माध्यमातून तर सोने-चांदी भेट वस्तूमधून ८,३६,२५४ रुपये परिवार देवता व हुंडीपेटीतून १,५७,२१,५२७ रुपये तिजोरीत जमा झाले आहे. त्याच बरोबरीने मोबाईल लॉकर व इतर जमेमधून १०,९४,८०७ रुपये समितीला प्राप्त झालेत. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेपेक्षा १,५६,४८,५२६ रुपये इतकी उत्पन्नात वाढ झाली आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे

हेही वाचा : “…म्हणून मंत्रीपदाच्या यादीतून अनिल देशमुखांचं नाव वगळलं”, अजित पवारांचा मोठा दावा

कार्तिकी यात्रेत सुमारे ३ लाख ४० हजार ४७८ एवढ्या भाविकांनी श्रींचे पदस्पर्श दर्शन घेतले. तर ५ लाख ७१ हजार २२० एवढ्या भाविकांनी श्रींचे मुखदर्शन घेतले असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. पंढरीच्या सावल्या विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शन घेतल्यावर भाविकांनी सढळ हाताने दान याही यात्रा कालावधीत दिल्याचे दिसून आले आहे.