पुण्यातील शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस या शाळेतील एका विद्यार्थ्यायाने चित्र काढली नाहीत म्हणून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे. हा अर्धांगवायूचा झटका आहे. या प्रकरणाची शाळा प्रशासनाकडे पालकांनी तक्रार केल्यावर तात्काळ शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यास निलंबित करण्यात आले आहे. शिक्षकाच्या मारहाणीत प्रसन्न पाटील याला दुखापत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसएसपीएमएस या शाळेतील चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती. मात्र प्रसन्न पाटील या सहावीतील विद्यार्थ्यांने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यानी प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले आणि त्याच्या चेहऱ्यावर, पोटावर मारहाण केली. या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा देखील झाला.

एवढा प्रकार घडून देखील शाळा प्रशासनाने माहिती प्रसन्नच्या घरी कळवली नाही. प्रसन्नला दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी घेऊन गेल्यावर पालकांना सविस्तर प्रकार समजला. त्यानंतर त्याला तात्काळ एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आज प्रसन्नच्या पालकांनी मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर संदीप गाडे याला तात्काळ निलंबित केले असून या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune schook teacher beat student mercilessly
Show comments