अलिबाग: जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत २ हजार ६२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत हे प्रमाण ८४ टक्के आहे. समाधानकारक पावसामुळे रायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या २८ धरणांपैकी २४ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. उर्वरीत चार धरणांमध्येही सरासरीच्या संचय क्षमतेच्या ८० टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसराला पाणी पुरवठा करणारे हेटवणे धरणही ९० टक्के भरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जून महिन्याच्या सुरूवातीला कोलाड येथील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ प्रकल्पात २३ टक्के पाणी साठा शिल्लक होता. यातील ९ धरणांमध्ये दहा टक्क्यांहून कमी पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचे ढग दाटले होते. जून महिन्याच्या वीस दिवसात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पाणी परिस्थिती बिकट झाली होती. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात पावसाने जोर धरला.

हेही वाचा : Nilesh Lanke : “सगळ्यांचा नाद करा पण पवारांचा नाही, नाहीतर…”, खासदार निलेश लंकेंचा राम शिंदेंना इशारा

जुलै महिन्यातही पावसाचा जोर कायम होता. जुलै महिन्यातील बहुतेक दिवस पावसाळीच होते. पावसाच्या जोरदार महिन्याभरात सतत बरसत होत्या. धरणांच्या क्षेत्रातही चांगल्या पावसाची नोंद झाली. यामुळे कोलाडच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ धरणांपैकी २४ धरणे पुर्ण क्षमतेनी भरली आहेत. ६७.४६८ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे. सुतारवाडी, आंबेघर, कोडगाव, कवेळे, ढोकशेत, घोटवडे, वावा, उन्हेरे, पाभरे, कुडकी, संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले, मोरबे, उसरण, फणसाड, श्रीगाव, कोलते-मोकाशी, डोणवत, बामणोली, उसरण ही धरणे पुर्ण क्षमतेनी भरली आहेत.

हेही वाचा : अपप्रचारांविरोधात व्यापक मोहीम राबवा

पुनाडे, अवसरे, रानिवली आणि कार्ले ही चार धरणे अद्याप पुर्ण क्षमतेनी भरली नसली तरी या चारही धरणात ८० टक्केहून अधिक पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे रायगडकरांची जलचिंता मिटली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत अजून वाढ अपेक्षित आहे.

हेही वाचा : राजकीय खटले मागे; मराठा आंदोलनाचा फटका बसल्याने राज्य सरकारची खबरदारी

नवी मुंबई, पेण, उरण आणि पनवेल परिसराला पाणी पुरवठा करणारे पेण तालुक्यातील हेटवणे धरणही ९० टक्के भरले आहे. या धरणाची साठवण क्षमता ५.१२ टिएमसी आहे. धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने लवकरच हे धरणही पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad 28 dams out of 34 full and in hetwane dam 90 percent water of its maximum capacity css