अलिबाग : रायगड जिल्ह्यात रस्ते अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गाचे रुंदीकरण, अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना, बेदरकार चालकाविरोधात कारवाईचा बडगा, या कारणांमुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण वर्षभरात कमी झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले असले तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत जिल्हा रस्ते यावर एकूण ७०० अपघातांची नोंद झाली. ज्यात २८१ जणांचा मृत्यू झाला. ५९३ जण गंभीर जखमी झाले. तर २२५ जण किरकोळ जखमी झाले. सन २०२२ मध्ये जिल्ह्यात ७२४ अपघातांची नोंद झाली होती. यात २७६ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. यावरून जिल्ह्यात अपघातांची संख्या कमी झाली असली तरी अपघाती मृत्यूची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. जिल्ह्यात २०१९ पर्यंत दरवर्षी सरासरी १ हजार अपघातांची नोंद होते. यात सरासरी अडीचशे ते तिनशे लोकांचा मृत्यू होत होते. तर सातशे ते आठशे जण जखमी होत होते. पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील अपघातांची संख्या सातत्याने घटत असल्याचे दिसून येत आहे.

Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
Woman killed five injured in horrific accident on Samruddhi Highway Nagpur news
समृद्धी महामार्ग: दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे; महिला ठार, पाच जखमी

हेही वाचा : पर्यावरण तज्ज्ञ अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन

मुंबई गोवा महामार्गावर १८३ अपघात झाले. यात ६२ जणांचा मृत्यू झाला. तर १८७ जण गंभीर जखमी झाले. मुंबई पुणे जुन्या महामार्ग ६९ अपघातांची नोंद झाली. यात १८ जणांचा मृत्यू झाला तर ७२ जण गंभीररीत्या जखमी झाले. मुंबई पुणे दृतगती मार्गावर ८५ अपघात नोंदविले गेले. यात २५ जणांचा मृत्यू झाला तर ७२ जण गंभीर जखमी झाले. वडखळ अलिबाग राष्ट्रीय महामार्गावर २० अपघात झाले ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला. इतर राज्यमार्गांवर १४७ अपघात झाले. ज्यात ६० जणांचा मृत्यू झाला. जिल्हा मार्गांवर १५७ अपघातांची नोंद झाली. ज्यात ५८ मृत्यू नोंदविले गेले.

जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्या वर्षात रस्ते अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जखमी होणाऱ्यांची संख्याही घटण्यास सुरवात झाली आहे. ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र त्याच वेळी अपघातांमधील मृतांची वाढती संख्या ही एक चिंतेची बाब असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पुणे दृतगती मार्गावर स्पीड कॅमेरे बसविल्यानंतर अपघातांचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येत आहे. पण त्याच वेळी मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याने या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अद्यापही जास्त आहे. वर्षभरात हे काम पुर्णत्वाकडे गेले तर अपघातांचे प्रमाण आणखी कमी होईल असा अंदाज रायगड पोलीसांनकडून व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा : “राम मांसाहारी होता”, आव्हाडांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले, “चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे आणि कोंबड्या कापणारे…”

अपघातांमागील कारणे कोणती

अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, चुकीच्या आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा ही अपघातामांगची प्रमुख कारणे आहेत. तर दृतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाडांचे टायर फुटणे ही अपघातां मागची प्रमुख कारणे आहेत. या शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर संथगतीने सुरु असणारे रुंदीकरण, बाह्यवळण मार्ग आणि दिशादर्शक फलकांचा आभाव, औद्योगिकरणामुळे अरुंद रस्त्यांवर वाढलेली अवजड वाहतूक हे देखील अपघांतामागचे प्रमुख कारण ठरत आहे.

महामार्ग अपघातातील आकडेवारी काय सांगते

वर्ष अपघात मृत्यू जखमी

२०१८ १०९८ ३०२ ७३२

२०१९ ९९१ २१६ ६१३

२०२० ५९६ २०६ ४०९

२०२१ ६८८ २३६ ३७९

२०२२ ७२४ २७६ ६८९

२०२३ ७०० २८१ ५९३

“रस्ते अपघातांचे प्रमाणकमी व्हावे यासाठी दोन पातळ्यांवर आम्ही काम केले. एकीकडे बेदरकार वाहनांवर सातत्याने कारवाई सूर ठेवली. तर दुसरीकडे वाहनचालकांमध्ये वाहतून नियमनाबाबत जनजागृती केली. यामुळे गेल्या वर्षभरात रस्ते अपघातांच प्रमाण कमी झाले आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ब्लॅक स्पॉट शोधून, त्यावर उपाययोजना करणे, ब्लिंकर्स बसवणे, गाडयांना रिफ्लेक्टर बसविणे, बाह्यवळण रस्त्याची पूर्व सुचना देणारे फलक लावणे यासारख्या उपाययोजना करत आहोत.” – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड

Story img Loader