अलिबाग: जपान, इंडोनेशिया, लेबनॉन मध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जाणारा जांभळ्या आणि निळ्या रंगाचा भात आता रायगड जिल्ह्यातही पिकणार आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून या भाताची यंदा प्रथमच लागवड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर ही लागवड करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांसाठी नगदी पिक ठरू शकणार आहे.

ब्लॅक आणि परपल राईस लागवड सुरवातीला जपान मध्ये सुरू झाली. नंतर फिलीपिन्स, चीन, थायलँण्ड, बांग्लादेश मध्ये या भाताची लागवड केली जाऊ लागली. चीन मध्ये राज घराण्यासाठी या प्रकारच्या भाताची लागवड केली जात असे, त्यास फॉरबिडट राईस असे नाव होते. कालांतराने भारतात पूर्वेकडील राज्यात या भाताची लागवड सूरू झाली. प्रामुख्याने मणिपूर आणि आसाम मध्ये याची लागवड केली जाते. आता राज्यातही या प्रकारच्या भात लागवडीचे प्रयोग सुरू झाले आहेत.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

जिथे पारंपारीक तांदुळाला खुल्या बाजारात ५० ते ७० रुपये प्रती किलोचा दर मिळतो. तिथे सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या जांभळ्या भाताला ४५० ते ५०० रुपये प्रती किलो पर्यंत दर मिळतो. मागणीच्या तुलनेत या भाताचे उत्पादन कमी असल्याने या तांदळाचे दर चढे राहतात. या तांदुळाला प्रामुख्याने पंचतारांकीत हॉटेल्स मधून मोठी मागणी असते. जापनी, चायनीज आणि थाई प्रकारचे पदार्थ बनवतांना या तांदूळाचा वापर केला जातो. जपान मधील जगप्रसिध्द ‘सुशी’ पदार्थ बनविण्यासाठी याच प्रकारच्या तांदळाचा वापर होत असतो. ‘स्टिकी राईस’ बनवतांनाही याच प्रकारच्या भाताचा वापर होते.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, मुंबई-पुण्यात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना?

गुळसूंदे येथील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी या वर्षी आपल्या शेतात इंडोनेशियातील निळा तांदुळ, थायोमल्ली जास्मिन राई, आणि लेबनॉन येथील जांभळ्या रंगाच्या भात पिकाची लागवड केली आहे. साधारणपणे ३० ते ४० क्विंटल प्रती एकरी उत्पादन यातून अपेक्षित आहे. महत्वाची बाब म्हणजे मिनेश यांनी गेल्या वर्षी काळ्या आणि तांबड्या रंगाच्या भात लागवडीचा प्रयोग केला होता. त्यातून चांगले उत्पादनही मिळाले होते. यातून तयार झालेले बियाणे त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिले होते. यावर्षी त्यांनी निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड करण्याचा निर्णय घेतला. बियाणे मागवून लागवड केली. संपुर्ण सेंद्रीय पध्दतीने हे पिक घेण्यात आले आहे. पाऊस परिस्थिती चांगली असल्याने पिकही जोमात आले आहे. त्यामुळे यातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.

कोकणात खरीप हंगामात भात पिकाची प्रामुख्याने लागवड केली जाते. मात्र ही लागवड करतांना शेतकरी प्रामुख्याने पारंपारीक वाणांना पसंती देतात. ज्यामुळे उत्पादन कमी येते आणि पिकाला चांगला दरही मिळत नाही. हीबाब लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागाने आत्मा प्रकल्पा आंतर्गत रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांना विवीध रंगी भात लागवडीला प्रोत्साहन देण्याचे उपक्रम राबविले होते. पहिल्या टप्प्यात काळ्या आणि तांबड्या रंगाच्या भात पिकाची लागवड करण्यात आले होती. त्यामुळे रायगड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण भात पिकाची लागवड करण्याकडे हळुहळू शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. यावर्षी कृषी विभागामार्फत स्वतः विवीध रंगी भात पिकाच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले नसले तरी शेतकऱ्यांनी मात्र पुढाकार घेऊन नाविन्यपूर्ण वाणांची लागवड केली आहे.

हेही वाचा : Video: IAS पूजा खेडकर यांच्या आईविरोधात गुन्हा दाखल; पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याची तक्रार!

जांभळ्या रंगाच्या तांदळाचे महत्व

बारीक पॉलिश तांदुळाचा “ग्लॅयसेमिक इन्डेक्स” जास्त असते तर रंगीत तांदळाचा ग्लॅयसेमिक इन्डेक्स कमी असते, त्यामुळे सदर तांदुळाचा भात खाल्ल्यानंतर रक्तात साखर एकदम वाढत नाही. त्यामुळे मधुमेह असलेले रुग्ण तांदुळाच्या भाताचा आपल्या आहारात वापर करु शकतात. वरील तांदुळात फायबर, प्रोटीन, आयर्न, व्हीटॅमीन्स्, ॲन्टीऑक्सीड्न्ट जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळेच एक पुरक आहार म्हणून या तांदुळाचा वापर होऊ शकतो.

गेल्या वर्षी काळ्या आणि तांबड्या भाताची लागवड केली होती. यातून तयार झालेले बियाणे यावर्षी इतर शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिले. यावर्षी जांभळ्या आणि निळ्या भाताची लागवड केली आहे. पिक तयार झाल्यानंतर याचे बियाणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देणार आहे. बाजारात या प्रकारच्या भाताची मागणी लक्षात घेतली तर शेतकऱ्यांसाठी हा भात नगदी पिक ठरू शकतो.

मिनेश गाडगीळ, शेतकरी गुळसुंदे

सामान्य तांदळाच्या तुलनेत रंगीत तांदळात पौष्टीक गुणधर्म जास्त आढळून येतात. आरोग्याच्या दृष्टीने ते अधिक चांगले मानले जातात. राज्यात अशा प्रकराच्या भाताची फारशी लागवड होत नाही. त्यामुळे त्यावर पुरेसे संशोधन झालेले नाही.

डॉ. रविंद्र मर्दाने, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ, भात संशोधन केंद्र कर्जत