अलिबाग: आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून ते घरात घुसले, घरझडतीचे वॉरंट दाखवून झाडाझडती घेऊ लागले. मात्र व्यवसायिकाला त्यांच्यावर संशय आला आणि त्याने पोलीसांना या घटनेची वर्दी दिली. या सतर्कतेमुळे चार तोतया आयकर अधिकाऱ्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक सलमान खातिब या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

रोहा शहरातील खालचा मोहल्ला येथे राहणाऱ्या मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी यांच्या घरी चार जण घरी आले. त्यांना आयकर अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवत घरात प्रवेश केला. नंतर मोहम्मद अन्सारी यांच्या नावाचे घरझडती दाखवून घाराची झडती घेण्यास सुरूवात केली. अन्सारी यांना या सर्वांबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी या घटनेची वर्दी तातडीने रोहा पोलीस ठाण्याला दिली. पोलीसांना कशाला बोलावले म्हणून चारही कथित आयकर अधिकाऱ्यांनी अन्सारी यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. यावेळी तक्रारदार यांची वहिनी तिथे आली. तिच्या गळ्यातील चेन जबरदस्तीने हिस्कावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलीस आणि शेजारचे तिथे आले. त्यांनी चारही जणांना ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा हे चारही जण तोतया आयकर अधिकारी असल्याचे समोर आले. पोलीसांनी चौघांनाही जेरबंद केले आहे.

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?

हेही वाचा : वीस दिवस बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला मिळाले जीवदान, वालावलकर रुग्णालयाच्या प्रयत्नांना यश

या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिते नुसार याबाबत रोहा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.१८२/२०२४, भारतीय न्याय सहिंता कलम ३०९(५), ३३६(२), ३४०(२), ३२९(४), २०४, २०५, ६१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई श्री सलमान खतीब हे करीत आहेत.

Story img Loader