अलिबाग – यंदा भात पिकाला प्रति क्विंटल २ हजार १८३ रुपये इतका दर जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाताच्या हमीभावात किरकोळ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावातून फारसा दिलासा मिळालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कृषी विभागाच्‍या प्रयत्‍नांमुळे यंदा रायगड जिल्‍ह्यात भाताची उत्‍पादकता वाढणार असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त होत आहे. त्‍यादृष्‍टीने शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रांवर भात विकणे सुलभ जावे यासाठी मार्केटींग फेडरेशनने जवळपास सर्व तयारी पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्‍यासाठी यंदा लवकर खरेदी केंद्र सुरू करण्‍याचा पणन विभागाचा मानस आहे. भात कापणीला सुरवात झाल्याने, येत्या १५ दिवसांत जिल्ह्यात ३० भातखरेदी केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे मार्केटींग फेडरेशनने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – “पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं त्यांनी शब्द पाळला आणि शरद पवारांनी…”, छगन भुजबळांचं वक्तव्य

मागील हंगामात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ४ लाख १० हजार मेट्रीक टन धान खरेदी मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात आली होती. गेल्या दशकभरात झालेली ही विक्रमी धान खरेदी होती. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या भात खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

जिल्‍ह्यात ९२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्‍यात आली. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत यंदा रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. जिल्ह्यात सरसारी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा ९८ टक्के पावसाची नोंद झाली. जून आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला तर जुलै आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यात पूर अतिवृष्‍टी यांचे प्रमाण खूपच कमी होते. त्‍यामुळे भातपिकाला अतिपावसाचा फटका बसला नाही. पिकांची वाढ चांगली झाली. त्‍यातच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची प्रति एकरी उत्पादक क्षमता वाढवण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात आले आणि त्‍याला यश मिळाल्‍याचे दिसून येत आहे.

दरवर्षी भात खरेदी केंद्र उशिरा सुरू होत असल्‍याने शेतकऱ्यांना बाजारात कमी दराने भात विकावे लागते. यात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेवून जिल्‍ह्यात यंदा ऑक्टोबर महिन्‍याच्‍या शेवटच्या आठवड्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्‍याचा जिल्‍हा प्रशासनाचा मानस आहे.

हेही वाचा – Petrol-Diesel Price on 12 October: आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल ‘या’ शहरात स्वस्त; पाहा मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती 

भात कापणीला सुरुवात झाली असल्याने मळणी काढल्यानंतर तत्काळ भाताच्या विक्रीने शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे. भात खरेदीसाठी केंद्रांना मंजुऱ्या देणे, गोदामांची डागडुजी, भात भरडाई करणाऱ्या मिलर्सचे करार वाढवणे, अशी कामे पणन महामंडळाकडून करण्‍यात आली आहेत.

रायगड जिल्ह्यात सर्वसाधारण भाताचीच खरेदी केली जाते. भात कापणीचा हंगाम सुरू झाल्‍याने भातखरेदीसाठी आमची पूर्वतयारी जवळपास पूर्ण झाली आहे. योग्‍य हमीभाव मिळू लागल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल शासनाला भात विकण्याकडे वाढू लागला आहे. यंदाही भाताच्या विक्रीला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. येत्या पंधरा दिवसांत खरेदी केंद्र सुरू करण्‍याचा प्रयत्‍न आहे. – केशव ताटे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी