अलिबाग: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी २६ जुलै २०२४ रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सावित्री, कुंडलिका आंबा नद्यांना पूर आला होता. गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “तेव्हा झोपले होते का?”, गिरीश महाजनांचा अनिल देशमुखांवर हल्लाबोल

हवामान विभागाने शुक्रवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी तीन तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad holiday declared for school students on friday css