अलिबाग : रायगड जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून ३ लाख ४९ हजार महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र यातील १ लाख ११ हजार महिलांचे आधार प्रमाणीकरण होत नसल्याने महिला लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहिल्या. बँकेच्या खात्याला आधार जोडणी होत नसल्याने, या महिला लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. आता वंचित राहीलेल्या ४५ हजार महिलांच्या खात्यांना आधार जोडणी करण्यात बँकांना यश आले आहे. त्यामुळे या महिलांना लाभाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आधार जोडणी अभावी अजूनही ६६ हजार महिला अद्याप वंचित राहील्या आहेत.

लाडकी बहिण योजनेच्या लाभाची रक्कम पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र लाभ हस्तांतरण करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या खात्याला आधार कार्डाची जोडणी आवश्यक आहे. सुरक्षित आणि पारदर्शक माध्यमातून महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि पैसे सहज आणि त्वरीत जमा व्हावेत हा आधार प्रमाणिकरणा मागचा हेतू आहे. मात्र लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाख भर महिलांच्या खात्यांना आधार जोडणी नसल्याने या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम

आणखी वाचा-धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

रायगड जिल्ह्यातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजेसाठी पहिल्या टप्प्यासाठी १ लाख ८१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. दुसऱ्या टप्प्यात १ लाख ६८ हजार प्राप्त झाले. अशा प्रकारे एकूण ३ लाख ४९ हजार महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी केली आहे. सुरवातीला २६ हजार अर्जांमध्ये त्रृटी आढळून आल्या होत्या. नंतर या दूर करण्यात आल्या. ८१८ अर्ज बाद ठरले होते. १४ ऑगस्ट पासून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली. मात्र ज्या खात्यांना आधार जोडणी झालेली नाही अशा खात्यांवर योजनेच्या लाभाची रक्कम जमाच होऊ शकलेली नाही.

जिल्ह्यातील १ लाख ११ हजार महिलांचे अर्ज आधार लिंकेज अथवा सिडींग नसल्याने, लाडकी बहिण योजनेच्या मंजुरीसाठी प्रलंबित राहिले होते. त्यामुळे इच्छूक लाभार्थी महिलांची ठिकठिकाणच्या बँकेच्या शाखांमध्ये गर्दी केली होती. यापैकी ४५ हजार अर्जदार महिलांच्या खात्यांचे आधार जोडणी करण्यात जिल्ह्यांतील बँकांना यश आले आहे. मात्र ६६ हजार खात्यांचे आधार जोडणी अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे या ६६ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.

आणखी वाचा-मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला युनेस्कोच्या पथकाने भेट देऊन केली पाहणी

बँकांकडून लाभार्थी महिलांच्या खात्यांला आधार जोडणीचे काम सुरू आहे. मात्र अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, सर्व बँकांना आधार लिंकीग आणि सिडींग करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सांगण्यात आले आहे. -विजय कुमार कुलकर्णी, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, रायगड</p>

अडचण काय

लाभार्थी महिलेचे एकच बँक खाते आधारशी लिंक करता येऊ शकते. त्याचे प्रमाणीकरण होऊ शकते. मात्र लाभार्थी महिलेनी दुसरा बँक खाते क्रमांक तर त्या खात्याला आधार लिंकेज करता येत नाही. त्यामुळे या महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे एनपीसीआय पोर्टलवर जाऊन लाभार्थी महिलेच्या बँक खात्याचे आधार सिडींग अथवा डिसिडींग करून घ्यावे लागते.

लाभार्थी महिलांचे बँक खाते आधार प्रमाणिकरण करण्‍यासाठी महिला वर्ग मोठया संख्‍येने बँकांमध्‍ये येत आहे. दुसरीकडे या कामाला प्राधान्‍य देण्‍याच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाकडून दिल्‍या जात आहेत. अनेक लाभार्थी महिलांची बँक खाती जुनी आहेत त्‍यांचे आधार प्रमाणीकरण करण्‍यातच बँक कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. त्‍यामुळे नियमित कामांवर त्‍याचा परीणाम होताना दिसत आहे.