अलिबाग : कोकणातील जत्रांचा हंगाम आता सुरू होत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि सलग पंधरा दिवस चालणाऱ्या खोपोली येथील साजगावच्या बोंबल्‍या विठोबा यात्रेला कार्तिकी एकादशी, गुरुवार (ता. 23) पासून सुरुवात होत आहे. पुर्वजांनी देवदर्शनाबरोबरच व्यापाराची घातलेली सांगड परंपरा आजही त्याच उत्साहात साजरी होत असून यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते आणि स्थानिकांना रोजगारदेखील मिळतो.

कार्तिकी एकादशीला पंढरपुरची यात्रा सुरु होते, त्याच दिवसापासून खोपोलीतील साजगावच्या यात्रेला सुरुवात होते. शेती कामांमध्ये अडकलेल्या भाविकांना पंढरपुर येथे जाता येत नाही, ते धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साजगावच्या यात्रांमध्ये येऊन देवदर्शन घेतात. घरी जाताना मिठाई, कपडेलत्‍ते , गृहोपयोगी भांडी, मसाल्यांच्या पदार्थांसह इतर अनेक जीवनावश्‍यक वस्‍तू घेऊन जातात. परंतु ही जत्रा सुक्‍या मासळीच्‍या व्‍यापारासाठी प्रसिदध आहे.

bomblya vithoba story, name of bomblya vithoba story
विठोबा, तुकोबाराय अन् मिरची… असे पडले खोपोलीच्या विठ्ठल मंदिराचे नाव ‘बोंबल्या विठोबा’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
work of Gavhan station is incomplete
गव्हाण स्थानकाचे काम अपूर्णच! लोकल स्थानकात थांबण्याची प्रवाशांना अद्याप प्रतीक्षाच
IND vs SA T20I Series Full Schedule With Date and Time with IST And Squads India South Africa
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
pune Senior Marathi writer Dr Veena Dev passed away on Tuesday
ज्येष्ठ लेखिका प्रा. वीणा देव यांचे निधन
Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Accident Viral Video
प्रत्येकवेळी नशीब साथ नाही देत मित्रा; भर वेगात चार कार आमने-सामने; VIDEO पाहून सांगा चूक नक्की कुणाची?

हेही वाचा : “तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा…”; नाशिकधील मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले…

दिवाळी पर्यंत कोकणात भाताची कापणी झालेली असते.धान्‍य घरात आलेले असते. त्‍याच्‍या विक्रीतून शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळत असतो. चार पैसे खर्च करण्‍याची ऐपत निर्माण झालेली असते. त्‍यामुळे देवदर्शनाबरोबरच वस्‍तुंची खरेदी, मनोरंजन या कल्‍पनेतून गावोगावी होणारया देवदेवतांच्‍या जत्रांची संकल्‍पना पुढे आली.

साजगावच्या यात्रेनंतर अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वरची यात्रा, मापगावची कनकेश्वरची यात्रा, वरसोलीची विठोबाची यात्रा तसेच डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीनिमित्त चौल-भोवाळेची यात्रा सुरू होते. पुढे एकविरा देवीचा यात्रा उत्सव झाल्यानंतर अनेक गावांमध्ये ग्रामदेवतांच्या जत्रा भरतात. साजगावच्या यात्रेपासून कोकणात सुरु होणारा यात्रांचा हंगाम थेट मे महिन्यापर्यंत चाललेला असतो.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, तुमच्या शहरातील भाव काय, वाचा…

ठराविक अंतराने येणाऱ्या यात्रांचाही स्वरुप कमीजास्त प्रमाणात सारखेच आहे; मात्र, त्याची सुरुवात आगळ्यावेगळ्या साजगावच्या यात्रेपासून सुरु होते. गेली अनेक शतका पासून या ठिकाणी सुरु असलेली यात्रा परंपरा अजूनही भव्य देवी स्वरुपात सुरु आहे. रायगडमधूनच नव्हे तर पुणे, कल्याण, मुंबई, महाड आदी भागातून लोक यात्रेला भेटी देत असतात. खाऊची दुकाने, विवि ध मनोरंजनाची साधने, खेळणी, आकाश पाळणे या पारंपारीक मनोरंजनाच्‍या साधनांबरोबरच आता अत्‍याधुनिक इलेक्‍ट्रीक पाळणेदेखील पहायला मिळतात. खाद्यपदार्थांमध्‍ये नवनवीन प्रकार आले असले तरी बैलाच्‍या चरख्‍यातून काढलेला उसाचा रस आणि गरमागरम जिलेबीचा आस्‍वाद जत्रेला येणारे भाविक आवर्जून घेत असतात.

बच्चेकंपनीला प्रतिक्षा

यात्रेला ग्रामीण भागात वेगळे स्थान आहे. लोकांच्या मनाला आनंद देणारा हा लोकोत्सव आहे. या निमित्ताने सगे-सोयरे, पै-पाहुणे, मित्रमंडळी आवर्जून एकत्र येतात. बच्चेकंपनीसाठी तर यात्रा म्हणजे पर्वणीच असते. यात्रेत काय घेऊ नी काय नाही असे त्यांना होऊन जाते. मग लहानग्यांसोबत मोठी मंडळीही लहान होत धम्माल करतात. या यात्रा हंगामाची सर्वजण आतुरतेने वाट पहात आहेत.

हेही वाचा : “तू कुठं भाजी विकत होता, कोणाचा बंगला…”, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल

काळानुसार बदल

पूर्वी कमणुकीची साधने नव्हती तेव्हा जत्रेत महाराष्ट्राची लोककला अर्थात तमाशाचा फडही रंगत असे. अमन तांबे, सुरेखा पुणेकर, काळू-बाळू आदी नामवंत कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करीत असत, मात्र अलीकडच्या काळात तमाशाची जागा डान्स पार्टीने घेतली. पूर्वी वीजेच्या दिव्यांची सुविधा नव्हती तेव्हा यात्रा दिवसा भरायची, आता दिव्‍यांचा झगमगाट रात्री उशीरापर्यंत यात्रा सुरु असते. मानवी ताकदीवर फिरणारया पाळण्‍याची जागा इलेक्‍ट्रीक पाळण्‍यांनी घेतली आहे.

Story img Loader