अलिबाग : वृद्ध महिलेने दोन वर्षाच्या बालकासह इमारतीवरून उडी टाकल्याची घटना, रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात घडली. यात गंभीर जखमी झाल्याने वृध्द महिलेसह दोन वर्षाच्या नातवाचा मृत्यू झाला. रोहा पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. उर्मिला सिध्दराम कोरे असे या महिलेचे नाव आहे.
शहरातील ओम चेंबर इमारतीत ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण रोहा शहरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. आजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, नातवाच्या गंभीर आजाराला कंटाळून उर्मिला यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.