अलिबाग: हॉटेल रुम मधील भाड्याच्या रकमेवरून झालेल्या वादातून एका महिलेला पर्यटकांनी अंगावर गाडी घालून चिरडल्याची घटना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे घडली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ज्योती धामणस्कर असे मृत महिलेचे नाव आहे. पिपरी चिंचवड येथील काही पर्यटक हरिहरेश्वर येथे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास दाखल झाले होते. अभी धामणस्कर यांच्या ममता होम स्टे येथे येऊन त्यांनी वास्तव्यासाठी रुमची विचारणा केली. यावेळी हॉटेल भाड्याच्या रकमेवरून त्यांचा आणि धामणस्कर यांचा वाद झाला. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर सर्वजण पळून जात असतांना ज्योती धामणस्कर त्यांना अडवण्यासाठी पुढे गेल्या मात्र त्यांना गाडीखाली चिरडून हे सर्व जण पसार झाले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ज्योती यांचा मृत्यू झाला आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Video Viral
रिलच्या नादात महिलेच्या पदराला लागली आग, जळता पदर घेऊन धावत सुटली, Video Viral
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल

हेही वाचा : Gayatri Shingne: ‘पवार साहेब, हेच का आमच्या निष्ठेचं फळ’, काकाच्या पक्षप्रवेशानंतर पुतणीचा अपक्ष लढण्याचा निर्धार; शरद पवार काय करणार?

आसपासच्या गावकऱ्यांनी यातील एका पर्यटकाला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. तर उर्वरीत जण गाडी घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेतील सर्व पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच….