रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत दीड लाखाचे ‘ब्राउन हेरोईन’ या अंमली पदार्थासह तिघांना ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढ-या घरफोड्या व चोऱ्यामुळे रत्नागिरी पोलीस जास्तच कार्यरत झाले आहे. या अनुषंगाने तसेच अवैद्य व्यवसाय यांचेवर कारवाई करण्यासाठी गस्ती पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करुन त्यामार्फत महत्वाच्या ठिकाणी गस्त घालण्याचे काम सुरु केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालीत असताना संशयीत हालचालीवरुन एकता नगर रत्नागिरी परिसरामधून आरोपी रऊफ इक्बाल डोंगरकर, (वय ३५ ) रा. उर्दु स्कूलजवळ, कर्ला, रत्नागिरी, नझीर अहमद मोहम्मद वस्ता (वय ३८) रा. वस्ता मोहल्ला, राजीवडा, रत्नागिरी, राहील अजीज सुवर्णदुर्गकर (वय २९) रा. राजीवडा बांध, रत्नागिरी या तिघांना ताब्यात घेवून त्यांचे कडून त ४०५ ब्राउन हेरोईन या अंमली पदार्थाच्या पुड्या व इतर साहीत्य असा एकूण १ लाख ४५ हजार ७५० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपींवर एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ अन्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.