दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्णै बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे ३० हजार लिटर डिझेल सदृश्य द्रवपदार्थ या नौकेसह जप्त केले. त्याची किंमत सुमारे ४७ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णै बंदर येथे एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी डिझेल सदृश्य द्रवपदार्थ आणला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी हर्णै बंदर येथे आपल्या पथकासह धाव घेतली. तेथे त्यांना सुफी नाव असलेल्या व एमएच ०७ एमएमएम २८८ हा क्रमांक असलेली मासेमारी नौका तेथे आढळून आली. या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या १४ खणांमध्ये सुमारे ३० हजार लिटर डीझेल सदृश्य द्रवपदार्थ आढळून आला. याच नौकेवर हा द्रवपदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही आढळून आला.

हेही वाचा : Uddhav Thackeary meets CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; विधीमंडळात १० ते १५ मिनिटांच्या चर्चेत काय घडले?

या प्रकरणी संशयित वामन पोशिराम रघुवीर (वय ३७)रा. हर्णै, हातीन केसरीनाथ कोळी (वय ३४) व दर्शन अनंत कोळी, (वय ३५) दोन्ही रा. बोडणी, रेवस ता. अलिबाग, संदीपकुमार मिठाईलाल मिसाद, (वय ३२) व शिव्य प्रमोद मिसाद (वय १९) रा. झापराबाद, जोनपूर (उत्तर प्रदेश) यांचेविरोधात विनापरवाना डीझेल सारख्या जीवनावश्यक व ज्वालाग्राही पदार्थाची कोणतीही योग्य ती खबरदारी न घेता मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल अशा रीतीने हाताळणी, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८७, ३(५) सह अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक आहिरे करत आहेत.

हेही वाचा : Uddhav Thackeray : महायुतीमधील नाराज नेते तुमच्या संपर्कात आहेत का? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, “मला त्यांचे निरोप…”

या कारवाईत पोलीस उपधीक्षक आवटी, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक राजकुमार यादव, दत्ता पवार, हेड कॉनस्टेबल सडकर, पंकज पवार, विकास पवार, सुहास पाटील, सुरज मोरे सहभागी झाले होते. दापोली पोलिसांच्या या कारवाईमुळे हर्णै परीसरात खळबळ उडाली आहे.

Story img Loader