रत्नागिरी: जिल्ह्याला सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे लांजा तालुक्यातील मुचकुंदी, राजापूर मधील काजळी नदी, चिपळूण मधील वाशिष्टी नदी आणि खेड मधील जगबुडी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने खेड, चिपळूण, राजापूर शहर आणि रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्ये घालून…”; संजय राऊतांची ‘धर्मवीर २’वर सडकून टीका

खेड बाजार पेठेत पाणी भरल्याने व्यापा-यांची धावपळ झाली. राजापुरमधील जव्हाहर चौकात पाणी भरले आहे. तर रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ratnagiri rain water accumulated in khed rajapur and chiplun market css