रत्नागिरी: चिरा वाहतूक करणारा भरधाव वेग असलेला ट्रक रेल्वे पुलाला जाऊन धडकल्याने या अपघातात ट्रक चालकासह क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. लांजा दाभोळे मार्गावरील तळवडे गावातील रेल्वे पुलाजवळ हा अपघात सोमवारी १२ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक कमलाकर भागप्पा केंगार (वय २८ रा. पांडोझरी, तालुका जत जिल्हा सांगली) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक ( केए २८ डी ५३१२) चिरा घेऊन चालला होता. सोमवारी राठोड रात्री साडेआठच्या सुमारास लांजा ते दाभोळे मार्गावर तळवडे गाव हद्दीतील रेल्वे पुलावर रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक चालक कमलाकर केंगार याने ट्रक चालवून रेल्वे पुलाला धडकला. या अपघातात चालक कमलाकर केंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम गेजगे (वय १७ रा. बोबलाड, तालुका जत जिल्हा सांगली) अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Supriya Sule : “मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा मझ्या पतीला…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

या अपघाताची नोंद यांचा लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर भारतीय न्या.सं. २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (३) मोठा वाहन अधिनियम कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे करत आहेत.