रत्नागिरी: राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडून स्थानिकांना अंधारात ठेवून मिऱ्या एमआयडीसीचा घाट घातला आहे. मात्र संपूर्ण मिऱ्या पंचक्रोशीने एकमुखाने या एमआयडीसीला ठाम विरोध केला आहे. उद्योगमंत्री असले तरी ते इथे पाहुणे आहेत, येथील जागेच्या मालकांना विचारल्याशिवाय याठिकाणी काहीही उभे करायला देणार नाही असा निर्धारच बैठक घेऊन मि-याच्या ग्रामस्थांनी केला आहे. राज्य शासनाने रत्नगिरीतील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या भागातील १७६.१४९ हेक्टर खाजगी क्षेत्र हे पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना सुद्धा २९ जुलैला जारी करण्यात आली आहे. मी-या येथील जागेवर विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असून हे लॉजिस्टिक पार्क म्हणून विकसित होणार आहे. तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा