संगमनेर : काही अपराध अथवा गुन्हा घडल्यानंतर एखाद्या व्यक्तीवर अथवा व्यक्ती समूहाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे प्रकार आपण दैनंदिन बघत असतो. परंतु संगमनेर मध्ये घडलेल्या एका अपराधातील गुन्हेगार कोणी व्यक्ती नसून कुत्रा आहे. या कुत्र्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा अजब प्रकार घडला. बरं, हा कुत्राही साधासुधा नसून तो एका मोठ्या डॉक्टरने पाळलेला आहे, शिवाय परदेशी वंशाचा आहे ! आता पोलीस त्याची काय आणि कशी चौकशी करणार याबाबत मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोठ्या शहरांमध्ये हौस म्हणून कुत्री पाळली जातात. त्याच्या मालकाला त्याच्या विषयी कितीही प्रेम असले तरी शहरी लोकांना त्या कुत्र्याची भीती असते. खेड्यापाड्यांमध्ये कुत्री मानवी जीवनाचा भाग आहेत. त्यामुळे गाव वस्तीवर कुत्र्यांची फारशी भीती बाळगली जात नाही. असे असतानाही संगमनेर लगतच्या एका मळ्यातील कुत्र्यावर मात्र दहशत निर्माण केल्याचा आरोप होतो आहे. या कुत्र्यावर गुन्हा दाखल होण्याबाबतचा घटनाक्रमही मोठा रंजक आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
high court order railway administration
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू, पालकांना चार लाख रुपये नुकसाभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?

जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेने या कुत्र्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर लगतच्या एका मळ्यामध्ये आम्ही राहण्यास आहोत. त्या परिसरातल्या एका रस्त्यावर राहणाऱ्या डॉ. पानसरे यांनी ‘ रॉटविलर ‘ जातीचा कुत्रा पाळलेला आहे. हा कुत्रा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर धावून जातो. अचानक भुंकत धावून येणाऱ्या कुत्र्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्रास होऊन भीती निर्माण झाली आहे. अशाच प्रकारच्या महिलेच्या बाबतीतही घडला असून संबंधित महिला त्या रस्त्याने जात असताना अचानक गेटमधून हा कुत्रा जोराने धावून आला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यात त्या महिलेला चांगलाच मार लागला असून संगमनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्या उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांनी पोलिसांना आपला जबाब देत या घटनेला कुत्र्याला जबाबदार धरले. हा अपघात केवळ डॉ. पानसरे यांचा कुत्रा धावून आल्याने झाल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

या साऱ्या प्रकारांनी प्रारंभी पोलीसही चक्रावून गेले. अखेरीस महिलेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांना कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे भाग पडले. आता पोलीस या घटनेची आणि या घटनेस कारणीभूत असलेल्या कुत्र्याची चौकशी करणार आहेत. या एकूणच प्रकाराबाबत सर्वत्र मोठी चर्चा असून ही चौकशी नेमकी कशी होते ? कुत्र्याला काय प्रश्न विचारले जाणार ? कुत्र्याच्या मालकाकडे चौकशी केली जाणार काय ? शिक्षा नेमकी कोणाला आणि काय देणार ? असे अनेक प्रश्न या अजब प्रकारातून निर्माण झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस हवालदार गजानन वाळके यांच्याकडे या चौकशीचे प्रकरण सोपवले आहे.

Story img Loader