सांगली : शेत खतविण्यासाठी बसवलेल्या शेळ्यामेंढ्याच्या कळपावर हिंस्त्र प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या हल्ल्यात ५ शेळ्या जखमी झाल्या असून हिंस्त्र प्राण्यांनी ७ मेंढ्या गायब केल्या आहेत. पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावरील भिलवडी येथे ही घटना घडली.
हेही वाचा : विजय शिवतारेंची टीका, “अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, या रावणाचा वध..”
महावीरनगर रस्त्यावरील चौगुले यांच्या शेतात मोहन हराळे यांचा ३०० शेळीमेंढीचा कळप महिन्यापासून रान खतवण्यासाठी वस्तीला आहे. पहाटे तीनच्या सुमारास कुत्री व मे़ढ्यांच्या आवाजाने जाग आल्यानंतर हराळे यांना हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्याचे दिसून आले. मेंढ्यांच्या नरडे व पोटावर हल्ले झाले होते. यामुळे २४ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच वन व पशूसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.