सांगली : बनावटगिरी करून सरकारी नोकरी केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना विटा पोलीसांनी बनावट दाखले देणार्या टोळीचा छडा लावला असून या प्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रिका तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगाचे कागद, शाळा सोडल्याचे कोरे दाखले, शिक्के असा ऐवज जप्त केला आहे. यापुर्वीही या टोळीवर बनावटगिरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. नेवरी (ता. खानापूर) येथे डाकपाल म्हणून नियुक्ती झालेल्या प्रमोद आमणे याच्या कागदपत्राची पडताळणी करत असताना त्याने दिलेले दहावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे पडताळणीत आढळून आले. यामुळे या प्रकरणी आमणे याच्याविरूध्द विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in