सांगली : इंदापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सांगली, विट्यात तीव्र पडसाद उमटले. विट्यात हल्लेखोराच्या निषेधार्थ ओबीसी व्हीजीएनटी परिषदेचे प्रदेश सरचिटणीस संग्राम माने यांच्या नेतृत्वाखाली विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शने करण्यात आली, तर सांगलीत निदर्शने करुन रस्त्यावर ठिय्या मारुन सांगली-मिरज वाहतूक रोखण्याचे प्रयत्न झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरक्षणावरुन समाजा-समाजामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न काही समाजविघातक शक्ती करत आहेत. ओबीसी समाजाला आपले आरक्षण टिकवायचे असून यासाठी लढा चालू आहे. समाजातील काही ठराविक जाती जर सोडल्या तर बाकीच्या जाती अजून मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर ओबीसीचे महामेळावे चालू आहेत. यावेळी आ. पडळकर समाजाची बाजू मांडत असताना काही विघ्न संतोषी माणसानी त्यांना लक्ष्य केले. पडळकर स्वकर्तृत्वावर मोठे झालेले नेतृत्व आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजाच्या ताकदीवर त्यांची राजकीय कारकिर्द चालू आहे. समाजाला न्याय देण्यासाठी कष्ट करणाऱ्या माणसाला जर असा प्रकार झाला तर तो ओबीसी समाज कदापि खपवून घेणार नाही. गरज पडली तर जशास तसे उत्तर द्यायला समाज कमी पडणार नाही, असे माने यांनी सांगितले.

हेही वाचा : “रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष, त्यांना…”, अमोल मिटकरांची टीका, ‘संघर्ष यात्रे’चाही घेतला समाचार

यावेळी निषेध आंदोलनात माने यांच्यासह उत्तम बापू चोथे, भीमराव अण्णा काशीद, किशोर डोंबे, दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब मेटकरी, जहीर मुलाणी, विपुल तळेकर, छोटू काळे, असलम मुल्ला, उदय नलवडे, रणजीत निंबाळकर, कृष्णा कुराडे, मंथन मेटकरी, दिलीप काळेबाग, विक्रम भिंगारदिवे, मोहन वेळापुरे, बापूराव खांडेकर यांच्यासह सर्व ओबीसी बांधव सहभागी झाले होते. दरम्यान सांगलीमध्येही निषेध आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको करुन वाहतूक रोखण्याचे प्रयत्न केले. यावेळी माजी महापौर संगीता खोत, दरिबा बंडगर, दीपक माने आदींसह ओबीसी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli and vita obc agitation to oppose attack on bjp mla gopichand padalkar css