सांगली: नवीन शिक्षकभरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने २४९ कंत्राटी शिक्षक नियुक्तीचे आदेश सोमवारी दिले. निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले असून त्यांना मासिक २० हजार रूपये मानधन देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात शिक्षक संख्या अपुरी आहे. पवित्र पोर्टल प्रणालीद्बारे शिक्षक भरती रखडली आहे. नवीन शिक्षक भरती होईपर्यंत कंत्राटी शिक्षक भरती करून शैक्षणिक कामकाज चालू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषदेने निवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागणी केली होती. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यात पुन्हा शिक्षकांचे काम करण्यास २५४ जणांनी उत्सुकता दर्शवली. छाननीनंतर या पैकी ५ जण अपात्र ठरले.

हेही वाचा… १० ड्रोन कॅमेरे, गस्ती पथके… ; चोख बंदोबस्तात शिराळ्यात प्रतीकात्मक नागपूजा

उर्वरित २४९ जणांना सोमवारी नियुक्तपत्र देण्यात आले. नियुक्त करण्यात आलेल्यामध्ये १८० शिक्षक मराठी माध्यमांसाठी, ६६ शिक्षक कन्नड माध्यमासाठी तर तीन शिक्षक उर्दु माध्यमांसाठी आहेत. तालुका निहाय या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी शंभर रूपयांचे बंधपत्र संबंधित कंत्राटी शिक्षकांनी गट शिक्षणाधिकार्‍यांकडे दाखल करायचे आहे. ही नियुक्त पवित्र पोर्टलद्बारे शिक्षक भरती होईपर्यंतच असेल असेही नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli appointment of 249 contract teachers to prevent the loss of education of the students dvr
Show comments