सांगली : भाजपकडून जतमध्ये स्थानिकांना उमेदवारीची संधी मिळाली नाही तर बंडखोरीचे संकेत माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिले. या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांना जतमधून भाजपची उमेदवारी देण्यास त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जत विधानसभेसाठी कोणाला उमेदवारी द्यावी याची विचारणा करण्यासाठी श्री. जगताप यांना भाजपकडून बोलावणे आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली. स्थानिक नेतृत्वाला जत विधानसभेची उमेदवारी मिळावी, अन्यथा आमचा उपऱ्या उमेदवाराला विरोध राहील असे सांगण्यात आल्याचे जगताप म्हणाले.

हेही वाचा : मिरजेवर ठाकरे गटाचा दावा; अन्यथा ‘सांगली पॅटर्न’चा इशारा

भाजपकडून उमेदवारीची अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत तालुक्याबाहेरील व्यक्ती उमेदवार म्हणून स्वीकारला जाणार नाही असेही श्री. जगताप यांनी सांगितले. दरम्यान, जतमध्ये प्रचारप्रमुख आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक तमणगोंडा रविपाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपच्या उमेदवारीवरून जतमध्ये स्थानिक विरुध्द उपरा असा वाद निर्माण झाला असून काही दिवसांपूर्वी पक्ष निरीक्षकांसमोर या वादातून हाणामारीचा प्रसंगही उद्भवला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli at jat assembly constituency former mla vilas jagtap oppose candidature of gopichand padalkar css