सांगली : लोकसभा निवडणुकीतील राजकीय वादातून बुधवारी रात्री भाजपमधून बाहेर पडलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मोटारीवर दगडफेक झाली. हा हल्ला अज्ञाताकडून झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असली तरी भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live: “सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना करू”, शरद पवार गटाचं जाहीरनाम्यात आश्वासन!

माजी आमदार विलासराव जगताप जत तालुक्यातल्या जिरग्याळ मधून डफळापूरकडे जात असताना तीन ते चार अज्ञातांकडून मोटारीवर दगडफेक करण्यात आली. लोकसभेचे उमेदवार अपक्ष विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौऱ्या दरम्यान जिरग्याळ-डफळापूर रस्त्यावर हा घडला प्रकार. विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा जगतापांचा आरोप आहे. भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपचा त्याग केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli at jat stone pelting on car of former bjp mla vilasrao jagtap css