सांगली : पुणे व सांगली पोलीसांच्या संयुक्त कारवाईमध्ये कुपवाडमध्ये १४० किलो मेफेड्रॉन (एमडी) या घातक अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी बुधवारी दिली. पुणे पोलीसांनी पुणे व दिल्लीमध्ये छापे टाकून कोट्यावधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थांचे धागेदोरे कुपवाडपर्यंत असल्याची माहिती पुणे पोलीसांना मिळाली.

हेही वाचा : निवासी डॉक्टर राज्यव्यापी संपावर ठाम, गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून जाणार संपावर

बुधवारी दुपारपासून पुणे पोलीसांनी सांगली पोलीसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामी मळा, बाळकृष्ण नगर आणि दत्तनगर या तीन ठिकाणी १४० किलो एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य २८० ते ३०० कोटी रुपये आहे. पुण्याहून मिठाच्या गोणीतून हा माल कुपवाडला आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे व सांगली पोलीसांनी संयुक्त कारवाई करुन घातक एमडी अमली पदार्थ जप्त करुन तिघांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.

Story img Loader