सांगली : वैरण आणण्यासाठी शेतात गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा तुटून पडलेल्या वीज वाहक तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी म्हैसाळ (ता. मिरज) येथे घडली. तर या दुर्घटनेत एका मुलाची प्रकृती अत्यवस्थ असून त्याच्यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृत तिघांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन देण्यात येईल असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

म्हैसाळ येथील सुतारकी मळा भागात असलेल्या वनमोरे मळ्यात पारसनाथ वनमोरे (वय ४०) आणि मुलगा शाहीराज वनमोरे (वय १५) हे दोघेजण आज सकाळी जनावरांना वैरण काढण्यासाठी गेले होते. यावेळी रानात अतिउच्च दाब वाहिनीची तार तुटून पडली होती. त्याला दोघांचा स्पर्श झाल्याने ते तारेला चिकटून बसले. अपघात घडल्याचे लक्षात येताच प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५) व त्यांचा मुलगा हेमंत वनमोरे (वय १२) या दोघांनी धाव घेतली. बापलेक दोघेही तारेला चिकटले. या दुर्घटनेत पारसनाथ वनमोरे, साईराज वनमोरे व प्रदीप वनमोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर हेमंत हा गंभीर जखमी झाला.

हेही वाचा : राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”

ही बाब लक्षात येताच मुख्य वाहिनीवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर या चौघांनाही वीजेच्या तारेपासून दूर करण्यात आले. हेमंत वनमोरे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा : तासगाव-कवठेमहांकाळमधील मारहाणीच्या निषेधार्थ सभा

दुर्घटनेची माहिती समजताच पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन भेट दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसोबत चर्चा करुन मृत झालेल्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत व हेमंत वनमोरेच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च देणेची घोषणा केली. तसेच या प्रकरणातील दोषींवर सखोल चौकशी करुन कडक कार्यवाही करणेचे आदेश दिले आहेत.