सांगली : भाजपचे स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधाकर खाडे (वय ५२) यांचा शनिवारी सकाळी मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. हा प्रकार जमिनीच्या कारणावरून झाला असून या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरज-पंढरपूर मार्गावर राममंदिराजवळ पावणे चार एकर जमीन विकसनासाठी खाडे यांनी घेतली होती. या व्यवहाराला कब्जेदार लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतली होती. आज सकाळी खाडे अन्य चार जणांसोबत जमिनीवर तारेचे कुंपण करण्यासाठी गेले असता त्यांचा वाद झाला. या वादात एकाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. घाव वर्मी बसल्याने ते जागेवरच कोसळले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकाराने मिरजेत खळबळ माजली आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा : Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…

खाडे हे दहा वर्षांपूर्वी राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. यानंतर त्यांनी जमीन व्यवहारात अधिक लक्ष केंद्रित केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यावर स्टार्टअप इंडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले होते.