सांगली : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी माधवनगर येथील एका तरूणाला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी २२ वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रूपये दंडाची शिक्षा गुरूवारी ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. आरोपी वासुदेव उर्फ रोहित चव्हाण (वय २७, रा. माधवनगर) याने नातेवाईक असलेल्या पिडीतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेउन तिच्यावर १ फेब्रुवारी ते २० मार्च २०२१ या कालावधीत मिरजेतील समतानगर परिसरात भाड्याच्या खोलीत अत्याचार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : वंचितची लोकसभेला महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री म्हणाले…

पीडीतेच्या आजीला व वडिलांना ठार मारण्याची धमकी देत त्याने लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी पिडीतेच्या आजीने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करून संशयित आरोपी विरूद्ध जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी संशयित आरोपीला दोषी ठरवून २२ वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रूपये दंड अशी शिक्षा आज सुनावली.