सांगली : कृष्णाकाठी असलेल्या औदुंबरसह जिल्ह्यात मंगळवारी दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. औदुंबर येथे गुरू दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. तर सांगलीतील हिराबाग पॉवर हाउस, जिल्हा परिषद, खणभाग, पेठभागमधील दत्त मंदिरामध्ये तर मिरजेतील मैदान दत्त मंदिर येथे असलेल्या एकमुखी दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
‘दिगंबरा दिगबंरा श्रीपाद वल्लभ दिगबंरा’च्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुबंर येथे सायंकाळी ५.३० वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी मंदीर परीसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली. आज दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुबंर येथे दाखल झाले होते. पहाटे ५ वाजल्यापासुन दत्त मंदीरामध्ये गर्दी झाली होती. श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदीर परीसर फुलांनी बहरून गेला.
हेही वाचा : राजकारणात येणार का? मनोज जरांगे म्हणाले, “लोकांचा समज होता की…”
आज दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती. भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचे दर्शन घेतले. रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती. औदुंबरमध्ये येणारे चारही रस्ते गर्दीनी वाहून गेले होते. औदुबंर फाटा या ठिकाणी व औदुबंरला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहानांची गर्दी झाली नाही. श्री दत्त सेवाभावी मंडळाच्यावतीने जेष्ठ नागरिकांना ने-आण करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती.
हेही वाचा : रायगड : अवैध रेती उत्खनन करण्यास विरोध केला म्हणून डोक्यातच फावडा घातला…
पहाटे काकड आरती, मंगल आरती दुपारी महापुजा, नैवद्य, महाआरती झाली. यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. श्री दत्त जन्माचे किर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदीरामध्ये संपन्न झाले. सायंकाळी साडेपाच वाजता श्री दत्त जन्मकाळ व आरती झाली. दत्त जयंती निमित्त मंदिरामध्ये व मुख्य गाभार्यास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. अंकलखोप ग्रामपंचाययतीच्या वतीने पाणी व वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. सरपंच राजेश्वरी सावंत, देवस्थान समितीचे अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, अमर पाटील, धनंजय सुर्यवंशी आदींनी यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली होती. यात्रेनिमित्त सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह सुमारे १०० पोलीसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात होता.