सांगली : सुर्याच्या दिशेने झेपावलेले आदित्य म्हणजेच सुर्ययान आणि यशस्वी चंद्रावर उतरलेले चांद्रयान ही यंदाच्या कवठेएकंद येथील दारू कामाची वैशिष्टये ठरली. दसर्या निमित्त सिध्दराज पालखीसमोर करण्यात आलेल्या शोभेच्या दारूकामामुळे रात्रभर कवठेएकंदचे आसमंत उजळून निघाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पश्चिम महाराष्ट्राची शिवकाशी अशी ओळख असलेल्या तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे ग्रामदैवत सिध्दराज यांच्या पालखीसमोर सुरू असलेले शोभेच्या दारूची आतषबाजी रात्रभर सुरू होती. बुधवारी सकाळी हे दारूकाम पालखी देवघरांच्या घरी पोहचल्यानंतर बंद झाली. शोभेच्या दारूची आतषबाजी पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. या दरम्यान, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलासह, रूग्णवाहिका, प्रथमोपचाराची सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून ठेवण्यात आली होती.
हेही वाचा : “एकनाथ शिंदे स्वतः हमास आहेत”, दसरा मेळाव्यातील ‘त्या’ टीकेला ठाकरे गटाचं प्रत्युत्तर
मंगळवारी रात्री शिलंगण चौकामध्ये पालखीसमोर गावचे मानकरी चव्हाण-पाटील यांच्या हस्ते आपटा पूजन झाल्यानंतर दारूच्या आतषबाजीला सुरूवात झाली. पालखी मंदिराजवळ आल्यानंतर अनेक दारूशोभा मंडळाच्यावतीने मंदिर परिसरातील खुल्या जागेवर औटांची सलामी देण्यात आली. एक हजारावर औट आकाशात गेल्यानंतर रंगबेरंगी दारूकामाचे प्रदर्शन होत होते. पालखी मार्गावर वेस, चक्र, मोर, फुगडी, लाकडी व कागदी शिंगट यांची आताषबाजी करण्यात येत होती.
यंदा नयनदीप दारू शोभा मंडळाकडून आदित्य एल-१, तर आकाशतारा मंडळाकडून चांद्रयान ३ मोहिमेचे दारूकामातून प्रदर्शन करण्यात आले. याशिवाय ए-वन युवा मंच व ईगल फायरवर्कर्स यांचे लंकादहन, शहीद भगतसिंग मंडळाकडून नीरज चोप्राचा भालाफेक, सिध्दीविनायक मंडळाकडून उगवता सुर्य आदी दारूकामाचे प्रकार प्रदर्शित करण्यात आले.
हेही वाचा : पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी संभ्रम वाढला
मिरजेत मिरवणुका
नवरात्रीची सांगता दुर्गादेवी मुर्तींच्या विसर्जन मिरवणुकीने करण्यात आली. गणेश विसर्जनाप्रमाणे यावेळीही लेसर किरण व ध्वनी वर्धकांचा खुलेपणाने वापर करण्यात आला. मात्र, रात्री दहा नंतर मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणा बंद करण्यात आली. मिरवणुकीमध्ये महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला. भाजपचे मिरज विधानसभा प्रचार प्रमुख मोहन नखंडे यांच्या मंडळाकडून ११० बाल वारकर्यांची काढण्यात आलेली दिंडी उल्लेखनीय ठरली.
हेही वाचा : गिरीश महाजनांचा फोन का उचलला नाही? मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना नुसतं…”
विट्यात पालखी शर्यती
दसर्या निमित्त विटा येथे रेवणसिध्दचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. सुळेवाडीची पालखी विट्यात आल्यानंतर विटा येथील पालखी व सुळेवाडी या दोन पालख्यांची शर्यत परतीच्या मार्गावर असते. मंगळवारी झालेल्या पालखी शर्यतीमध्ये विट्याच्या पालखीने बाजी मारली. सुळेवाडीची पालखी नाययावर अडथळा आल्याने विट्याची पालखी पुढे काढण्यात आली. या वेळी तरूणांची मोठी रेटारेटीही झाली. पालख्यांची शर्यत पाहण्यासाठी विट्यासह आसपासच्या गावातून आलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती.