सांगली : कमी किंमतीत सोने देतो असे सांगून २६ लाखांची लूट झाल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचार्‍यांवर पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई गुरूवारी रात्री केली. या प्रकरणी पोलीसांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याची जाहीर टीका करीत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सखोल चौकशीची मागणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंध्र प्रदेशमधील सराफा व्यावसायिकाला कमी किंमतीत सोने देतो, असे सांगून जतमधील औद्योगिक वसाहतीमध्ये बोलवण्यात आले होते. त्यानंतर अर्धा किलो सोने सराफाला देण्यासाठी २६ लाख ५० हजार रूपये आरोपींनी सराफाकडून घेतले. सराफाला चर्चेत मग्न ठेऊन त्याच्या हातातील पैशांच्या पिशवीसह आरोपींनी पलायन केले. या प्रकरणी संबंधित सराफाने जत पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर पाच जंणाविरूध्द गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : राज्यातील संरक्षित स्मारकांचे १० वर्षांसाठी आता संस्थांना पालकत्व, राज्य शासनाकडून ‘महाराष्ट्र वैभव’ योजनेत सुधारणा

दरम्यान, या प्रकरणामध्ये पोलीस व राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप जगताप यांनी चार दिवसांपुर्वी केला होता. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पोलीस कर्मचारी समीर मुल्ला, विजय नरळे आणि तुळशीराम धुमाळ या तिघांवर पोलीस अधीक्षक तेली यांनी निलंबनाची कारवाई केली.