सांगली : सांगली पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी जिल्ह्यातील ७९ गावांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी दिली. गेल्या वर्षी ५७ गावांमध्ये एकच गणपती होता, यावर्षी आणखी २२ गावे यामध्ये सहभागी झाली आहेत. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे, उपविभागीय आणि जिल्हा स्तरावर गणेश मंडळे आणि शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी ग्रामीण भागासाठी एक गाव, एक गणपती आणि शहरी भागासाठी एक वाॅर्ड एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे आवाहन करत अशा मंडळांना व गावांना विशेष पुरस्कार देण्याचे जाहीर केले. त्यास जिल्ह्यातील ७९ गावांतील कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली असून सर्व गावकरी या उत्सवात आनंदाने सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : युवकांना घडवण्याचा उपक्रम, विस्तारासाठी मदत आवश्यक

Three and a half thousand seats reserved in 153 schools for RTE admission in Vasai news
वसईत आरटीई  प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
नागपूर : मकरसंक्रांतीला पतंगबहाद्दरांचा रस्त्यावर धिंगाणा! तब्बल १७ जण रुग्णालयात…
Cases of sudden hair loss in Shegaon taluka increased again
शेगावातील केसगळतीची रुग्णसंख्या १४९ वर, भयाची व्याप्ती वाढली
1161 birds of 105 species recorded in Kalamba Lake in Kolhapur
कोल्हापुरातील कळंबा तलावात १०५ प्रजातींच्या ११६१ पक्ष्यांची नोंद
Sambhal Jama mosque
संभल येथील जामा मशिद परिसरातील विहिरीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मंदिर की मशिदीला मिळणार पाणी?

नावरसवाडी, रसुलवाडी, भिलवडी स्टेशन, ऐनेवाडी, पोसेवाडी, धोंडगेवाडी, जाखिनवाडी, ढोराळे, आडसरवाडी, भिवघाट, करंजे, हिवरे, कुसबावडे, ताडाचीवाडी, बाणुरगड, धोंडेवाडी, मोही, रामनगर, भडकेवाडी, सुलतानगावे, बेणापूर, भुड, कळंबी, कामथ, बोंबेवाडी, गोमेवाडी, मिटकी, घुलेवाडी, मासाळवाडी, मुढेवाडी, घरनिकी, कानकात्रेवाडी, तनपुरेवाडी, आंबेवाडी, औटेवाडी, गुळेवाडी, कुरंदवाडी, येडे, रेणुसेवाडी, तुपेवाडी, पाडळी, कचरेवाडी, वाजेगाव, सोनसळ, फारणेवाडी, आंबेवाडी, अस्वलेवाडी, बेलेवाडी, उपवळे, अंत्री बुद्रुक, किनरेवाडी, मोहरे, सुंदलापूर, कदमवाडी, गुगवाड, व्हसपेठ, मल्हाळ, साळमाळगेवाडी, अमृतवाडी, पाच्छापूर, बालगाव, अग्रण धुळगाव, घाटनांद्रे, पिंपळवाडी, म्हैशाळ एम, करलहट्टी, सराटी, वाघोली, चुडेखिडी, गर्जेवाडी, मोटेवाडी तुर्क, जालीहाळ, अंकलगी, जालीहाळ खुर्द, निवर्गी, मायथळ, आंबाचीवाडी तसेच धोत्रेवाडी अशा ७९ गावांनी यावर्षी एक गाव योजनेत सहभाग नोंदवला आहे. एक गाव, एक गणपती संकल्पना राबवत असताना कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, तसेच याबाबत लोकांच्यात जागृतीही करावी, असे आवाहन घुगे यांनी केले.

Story img Loader