सांगली : सांगली पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी जिल्ह्यातील ७९ गावांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी दिली. गेल्या वर्षी ५७ गावांमध्ये एकच गणपती होता, यावर्षी आणखी २२ गावे यामध्ये सहभागी झाली आहेत. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे, उपविभागीय आणि जिल्हा स्तरावर गणेश मंडळे आणि शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी ग्रामीण भागासाठी एक गाव, एक गणपती आणि शहरी भागासाठी एक वाॅर्ड एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे आवाहन करत अशा मंडळांना व गावांना विशेष पुरस्कार देण्याचे जाहीर केले. त्यास जिल्ह्यातील ७९ गावांतील कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली असून सर्व गावकरी या उत्सवात आनंदाने सहभागी झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा