सांगली : पतीवर करणी करून चहातून विष दिले असल्याचा आरोप करत अंगावर कुत्रा सोडून त्याच्याकडून चावा घेण्याचा प्रकार नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे घडला. कुत्रा चावल्याने महिला जखमी झाली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : सांगली: जिल्ह्यात चार ठिकाणी अतिवृष्टी; ओढे, नाले दुथडी

याबाबत मिळालेली माहिती अशी, गंगुबाई उत्तमखोत यांचे शेणखत भरण्याचे काम सुरू होते. यावेळी खत भरण्यासाठी शेजारी राहणारा श्रीकांत खोत हा कामासाठी आला होता. कामगारांनी खत भरत असताना चहा मागितला. चहा करून दिल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या श्रीकांत खोत यांची पत्नी सोनाबाई खोत या त्या ठिकाणी आल्या. त्यावेळी नवर्‍यावर करणी केली असून चहातून विष दिले असल्याचा आरोप करत शिवीगाळ केली. तसेच सोबत असलेला कुत्राही फिर्यादी महिलेच्या अंगावर सोडण्यात आला. यामुळे कुत्र्याने पायाला चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत.