सांगली : सीओपीडी म्हणजे दीर्घ कालावधीसाठी श्वसनास अडथळा आणणारा फुप्फुसांचा चिवट विकार. जगभरातील एकूण मृत्यूच्या आकडेवारीत आज सीओपीडीचा तिसरा क्रमांक लागतो. नियमित औषधोपचार , सकस आहार, डसनाचा व्यायाम, तणावरहित जीवनशैली याशिवाय तज्ञ डॉक्टरांचा विनाविलंब सल्ला, त्यांनी दिलेली औषधे नियमितपणे आणि वेळेवर घेतल्यास सीओपीडीमुळे होणारा त्रास आटोक्यात राहू शकतो, असे मत छातीरोग विशेषतज्ज्ञ डॉ.अनिल मडके यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : अलिबाग : बँकेचा व्यवस्थापकच निघाला लबाड, एसबीआयच्या श्रीबाग शाखेच्या फसवणूकीत मॅनेजर सामील
जागतिक सीओपीडी दिनानिमित्त सांगलीतील श्वास रूग्णालयाच्यावतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमामध्ये डॉ. मडके यांनी या आजाराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कोणत्याही प्रकारचा धूर, धूळ हे सीओपीडीचे कारणीभूत घटक आहेत. त्यातील वेगवेगळ्या घातक घटकांमुळे सीओपीडीचा त्रास संभवतो. ज्यांचा धुराशी अथवा धुळीशी संपर्क येतो अशा सर्वांना सीओपीडीचा धोका संभवतो. सुरूवातीच्या टप्प्यात थोडासा दम लागणे, डास लागणे किंवा व्यायामानंतर दम लागणे अशा तक्रारी दिसतात. नंतरच्या टप्प्यात छातीतून घरघर आवाज येणे, डास घेणे खूपच कठीण होत जाणे, थुंकीचा घट्टपणा किंवा थुंकीचे प्रमाण वाढणे , क्वचित प्रसंगी थुंकीतून रक्त पडणे, वारंवार सर्दी, फ्ल्यू सारखी लक्षणे दिसणे एवढेच नव्हे तर डसनमार्गात जंतूसंसर्ग किंवा न्यूमोनिया होणे, अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात.