सांगली : कोयना, चांदोली धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगलीच्या उंबरठ्यावर महापूर उभा ठाकला असून मिरजेतील कृष्णाघाट येथे पाण्याने इशारा पातळी गाठली आहे. सांगलीतील सुर्यवंशी, इनामदार प्लॉट येथील ४० कुटुंबांनी गुरूवारपर्यंत स्थलांतर केले असून पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असून आयर्विन पूलाजवळ ३५ फूटापर्यंत पातळी जाउ शकेल असा कयास आहे.

गेले काही दिवसापासून संततधार पाउस कोसळत असून यामुळे कृष्णा खोर्‍यातील नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहे. यामुळे कृष्णा, वारणा या नद्या दुथडी भरून वाहत असतानाच चांदोली व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून यामुळे नदीतील पाणी पातळी वाढत आहे. गुरूवारी कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून कळविण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
odisha cyclone
ओडिशात १.७५ लाख एकर पिकांचे नुकसान, दाना चक्रीवादळाचा परिणाम
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
water supply in pune hadapsar magarpatta area will be closed
हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !
Three laborers died after a water tank collapsed in Pimpri Chinchwad
Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
traffic on Solapur road, Fatimanagar Chowk, Signal off at Fatimanagar Chowk, pune,
पुणे : सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार? फातिमानगर चौकातील सिग्नल बंद

हेही वाचा : “गृहमंत्रीपदाचा उपयोग धमकावण्यासाठी करत आहात का?”, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना संतप्त सवाल

आयर्विन पूलाजवळ नदीतील पाणी पातळी गुरूवारी सायंकाळी चार वाजता ३२ फूट ११ इंचावर पोहचली असून मिरजेतील पाणी पातळी ४५ फूट ५ इंच झाली असून इशारा पातळी ४५ फूट आहे. इशारा पातळीपेक्षा ५ इंच पाणी पातळी जादा असल्याने कुरणे वस्तीची वाट बंद झाली आहे. या परिसरातील जनावरे मिरजेत सुरक्षित स्थळी हलविण्यात आली आहेत.

मिरज व सांगली येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या असून मिरजेसाठी पंढरपूर मार्गावर अंत्यविधीची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सांगलीसाठी कुपवाडमधील स्वामी मळा स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा : Ashish Shelar :देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना आशिष शेलारांचे चार प्रश्न, म्हणाले…

जिल्ह्यातील चांदोली धरणात आज २९.९६ तर कोयना धरणात ७८.२९ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. चांदोलीतून १० हजार ४६० तर कोयनेतून ११ हजार ५० क्युसेकचा विसर्ग सुरू होता. तथापि, कोयनेत पाण्याची आवक वाढती असल्याने गुरूवारी सायंकाळी सातवाजलेपासून २० हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असून सांगलीत पाणीपातळी ३५ फूटापेक्षा जादा होण्याचा अंदाज आहे. तर अलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला असून सायंकाळी ६ वाजलेपासून ३ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे.

हेही वाचा : Ratnagiri Rain News: खेड – दापोलीला पावसाने झोडपले, खेड बाजारपेठेत पाणी शिरल्याने राष्ट्रीय आपत्ती दल तैनात

कृष्णेतील पाणी पातळी वाढत असल्याने कर्नाळ रोड, काकानगर, दत्तनगर, शिवनगरआदी रहिवासी क्षेत्रातील नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत. सांगली शहरातील ४० कुटुंबानी स्थलांतर केले असून पूरग्रस्तांसाठी खणभागातील शाळेत निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २०.५ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.