सांगली : माजी महापौर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक कांबळे (वय ६५) यांचे पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी निधन झाले. मिरजेसह जिल्ह्यात दलित चळवळीत सक्रिय सहभागी होऊन त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला होता. मिरज नगरपरिषेदपासून महापालिकेपर्यंत त्यांनी आपल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत असताना महापौर पदही भूषविले होते.

हेही वाचा : “त्या पार्टीत गिरीश महाजनांसह पाच भाजपा नेते”, व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

दि. १५ नोव्हेंबर रोजी मार्निंग वॉक करीत असताना त्यांना एका वाहनाने ठोकरले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचे निधन झाले. सायंकाळी मिरज कृष्णाघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Story img Loader